आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचा शेप किती चांगला आहे हे तुम्हाला माहीत आहे का?- डोनाल्ड ट्रम्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच फ्रान्सच्या दौऱ्यावर गेलेल्या ट्रम्प यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांची पत्नी (फर्स्ट लेडी) ब्रिजिट मॅक्रो यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली. 
 
ट्रम्प गुरुवारी ब्रिजिट मॅक्रो यांना म्हणाले, “ तुमचा शेप किती चांगला आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?” एवढे बोलून ते इमॅन्युएल यांच्याकडे वळले आणि यांचा फिजिकल शेप चांगला आहे, अशी टिप्पणी केली. अर्थात ज्या वेळी ट्रम्प हे ब्रिजिट यांची स्तुती करत होते, त्या वेळी त्यांची पत्नी मेलानियाही जवळच उभ्या होत्या. प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, या घटनेआधी पॅरिसमधील स्वागत समारंभात ट्रम्प आणि ब्रिजिट मॅक्रो यांनी परस्परांशी बिनदिक्कत हस्तांदोलन केले होते. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक लोकांनी ट्रम्प यांच्या टिप्पणीवर टीका केली आहे. अर्थात व्हाइट हाऊसने टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...