आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्प यांना भारतीयांचा पाठिंबा, समर्थनार्थ राजकीय कृती समितीची स्थापना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेची खरी आशा आहेत, अशी भूमिका मांडून अमेरिकेतील भारतीयांनी ट्रम्प यांच्या समर्थनार्थ राजकीय कृती समितीची स्थापना केली आहे. त्यांच्या धोरणांमुळे समुदायाला अधिक फायदा होऊ शकेल, अशी अपेक्षाही या गटाने व्यक्त केली आहे.
‘इं़डियन-अमेरिकन्स फॉर ट्रम्प २०१६’ या नावाचा हा राजकीय कृती गट (पॉलिटिकल अॅक्शन कमिटी-‘पीएसी’) आहे. त्याची स्थापना २१ जानेवारी रोजी झाली असून आगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना या गटाकडून पाठिंबा देण्यात आला आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेणे, देशाला जागतिक व्यासपीठावर आणणे, दहशतवादाचा पराभव करणे, शांततेची स्थापना करण्याच्या दृष्टीने ट्रम्प यांच्याकडे असलेली विषयपत्रिका चांगली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्याकडून भारतीय समुदायाला मोठ्या अपेक्षा आहेत. एक उत्तम आशा म्हणून ट्रम्प यांच्याकडे पाहिले जाऊ लागले आहे. म्हणूनच ते राष्ट्राध्यक्ष पदासाठी अत्यंत योग्य उमेदवार असल्याचे आम्हाला वाटते, असे राजकीय कृती गट पीएसीने म्हटले आहे. भारतीय वंशाच्या समुदायातील अधिकारी वर्गानेदेखील ट्रम्प यांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘बिम्बो’ शब्दातून नवा वाद
अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजची वृत्तनिवेदिका मेगिन केलीविषयी बिम्बो (सुंदर, परंतु मूर्ख) शब्दाचा वापर करून वाद ओढवून घेतला आहे.

ट्रम्प यांनी संबंधित वाहिनीवरील चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. गेल्या वर्षीच्या अशाच कार्यक्रमात निवेदिका केली यांच्या प्रश्नामुळे राग आला होता याची आठवण त्यांनी करून दिली. त्यांनी टि्वटरवर म्हटले की, मेगिन केली यांना बिम्बो म्हणणार नाही. कारण ते राजकीय दृष्टीने योग्य होणार नाही. याऐवजी त्यांना एक किरकोळ पत्रकार म्हणेन. माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर नाही. ती आपल्या कामात खूप चांगली आहे असे मला वाटत नाही.
रिपब्लिकन पार्टीच्या अन्य उमेदवारांनी ट्रम्प यांच्यावर कठोर टीका केली आहे. अमेरिकी सिनेटर टेड क्रूझ यांनी त्यांच्यावर हल्ला करत म्हटले की, केलींच्या प्रश्नाला ते घाबरले आहेत.