आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डोनाल्ड ट्रम्प कायमच ठेवणार आक्रमक प्रचाराची रणनीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेके जे मिलर- अमेरिकी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाच्या संभाव्य उमेदवाराच्या प्रचार व्यवस्थापकाच्या डेस्कवर ठेवलेल्या पट्टीवर लिहिले आहे, डोनाल्ड ट्रम्प यांना डोनाल्ड ट्रम्पच राहू द्या. शोमन जमावासमोर जादू चालवतात. परंतु, ते नवीन प्रकारचे रसायन आहे. गेल्या काही महिन्यांपासून असेच सुरू होते. ट्रम्प जितके अधिक नियम मोडत होते, तितके ते प्रभावी वाटत होते. युद्धातील हीरोला अपमानित केल्याने शाबासकी मिळत होती. म्हटले जात होते की, आपण प्रसिद्धीच्या झोतात आहात. परंतु, ट्रम्प यांनी कधीच म्हटले नाही की, राजकीयदृष्ट्या ते योग्य आहे. ते म्हणाले, त्यांच्या विरोधकांनी कुकर्म किंवा हत्येचे समर्थन केले आहे. ट्रम्प यांच्या प्रचारशैलीमुळे रिपब्लिकन पक्षाने प्राथमिक फेरीत आजवरच्या इतिहासात सर्वाधिक समर्थन मिळवले आहे. त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष निवडणुकीची वेळ आली तेव्हा तेव्हा त्यांच्याकडून प्रचार संहितेमध्ये बदल होण्याची शक्यता नाही. उमेदवारीसाठी आवश्यक मते प्राप्त केल्यावर ट्रम्प म्हणाले, आपण विचार करता की, मी बदलेन म्हणून. परंतु, मी बदलणार नाही. या घोषणेनंतर राष्ट्रीय पाहणीत ट्रम्प यांची रेटिंग हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा सहा अंकाने कमी राहिली. त्यांनी जून महिन्यात जातीयतेच्या आधारावर एका न्यायाधीशाच्या निष्पक्षतेवर प्रहार केला. आणि शंका व्यक्त केली की, राष्ट्रपती आेबामा यांचे इस्लामी दहशतवाद्यांसोबत संबंध असू शकतात.

निवडणूक निधीबाबत ट्रम्प मागे आहेत. हिलरी क्लिंटन यांनी आतापर्यंत टेलिव्हिजन जाहिरातींवर १५० कोटी रुपये खर्च केला आहे. मे महिन्याच्या अखेर त्यांनी प्रचारयात्रांवर ४०० कोटी रुपये खर्च केलेला आहे. तिकडे, रिपब्लिकन पार्टी जी सहा आठवडे आधीपर्यंत त्यांच्यासोबत होती ती आता विचार करू लागली आहे. पार्टीचे प्रमुख नेते आणि प्रतिनिधी जुलैमध्ये क्लिव्हलँडमध्ये होणाऱ्या पक्षाच्या संमेलनात ते उमेदवारीला सुरुंग लावण्याच्या विचारात आहेत. रिपब्लिकन रणनीतीकार स्कॉट रीड यांचे म्हणणे असे की, ट्रम्प यांना ट्रम्पच राहू द्या, ही घोषणा हास्यास्पद आहे. त्यांना परिपक्व होण्याची गरज आहे.

दरम्यान, ट्रम्प यांचे प्रचार व्यवस्थापक लेवानडोवस्की यांना काढून टाकले आहे. ट्रम्प यांची मुले आणि सहकारी लेवानडोवस्की यांच्या व्यवहारावरून संतुष्ट नव्हते. ट्रम्प यांच्या प्रचारामध्ये ज्या उणिवा दिसतात त्यामध्ये ते मोठ्या शहरांऐवजी लहान ठिकाणांवर लक्ष केेंद्रित करत आहेत. ट्रम्प यांच्यासाठी सर्वाधिक नुकसानकारक घटनाक्रम म्हणजे संसदेच्या प्रतिनिधी सभागृहाचे स्पीकर पाल रायन यांच्या वागण्यातील बदल आहे. त्यांनी ट्रम्प यांना समर्थन जाहीर केले होते. रिपब्लिकन पार्टीचे प्रतिनिधी मंडळ ट्रम्प यांच्या विरुद्ध एक होताना दिसत आहेत.

नवीन घटनाक्रमात ट्रम्प यांनी आपली रणनीती बदललेली दिसते. पैसा गोळा करण्यासाठी ई-मेल पाठवले जात आहेत. नवीन रणनीतीची झलक २२ जून रोजी पाहायला मिळाली. ट्रम्प यांनी हिलरी यांचा आर्थिक अजेंडा आणि विदेशी धोरणांवर टीका केली. ते म्हणाले की, हिलरी राष्ट्रपतीची निवडणूक लढवणाऱ्या सर्वाधिक भ्रष्ट नेत्या आहेत. (सोबतफिलिप इलियट, जे न्यूटन स्मॉल).

घसरती रेटिंग
आपल्याआकर्षक व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असलेले उमेदवार आधुनिक इतिहासातील सर्वात अलोकप्रिय पार्टी उमेदवार दिसत आहेत. त्यांच्या अस्वीकृतीची रेटिंग गेल्या महिन्याच्या रेटिंगपेक्षा दहा अंकांनी वाढून ७० टक्क्यांवर पोहोचली आहे. ट्रम्प यांचा फॉर्म्युला उद्ध्वस्त होताना दिसत आहे.
बातम्या आणखी आहेत...