आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षपदाची निवडणूक, बॉबी जिंदाल स्पर्धेबाहेर, वेळ योग्य नसल्याचा खुलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- लुसियाना प्रांताचे गव्हर्नर बॉबी जिंदाल यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे ते पहिले भारतवंशीय आहेत. सध्या माझ्यासाठी अनुकूल वातावरण नसल्याचे त्यांनी सांगितले. ते रिपब्लिकन पार्टीकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात होते. आघाडीच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपण माघार घेतल्याचे जाहीर केले. रियल इस्टेटमधील बडे प्रस्थ डोनाल्ड ट्रम्प आणि सेवानिवृत्त मेंदूविकारतज्ज्ञ बेन कर्सन या स्पर्धेत आघाडीवर आहेत. ४५ वर्षांपूर्वी बॉबी यांचे पालक अमेरिकेत स्थायिक झाले होते. रिपब्लीकन पक्षाचे ते प्रभावशाली सदस्य आहेत.
१० नोव्हेंबर रोजी झालेल्या जाहीर कार्यक्रमात ते आपली पात्रता सिद्ध करण्यात अपयशी ठरले होते. दोन वेळा ते लुसियाना प्रांताचे गव्हर्नर म्हणून निवडून आले. रिपब्लिकन पार्टीचे काम आपण करत राहणार. हा पक्ष विकासाच्या तत्त्वावर मजबूत झाला असून संधीच्या आधारे घडलेला नाही, असे मत जिंदाल यांनी व्यक्त केले. आपल्या प्रचार अभियानात त्यांनी स्वत:च्या भारतीय वंशाला फारसे महत्त्व दिले नव्हते. त्यामुळे अमेरिकन भारतीय समुदायावर त्याचा फारसा प्रभाव पडलेला नव्हता. अमेरिकन असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे ते वारंवार सांगतात.