आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत वंशवादातून प्रथमच भारतीयाचा खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 ह्यूस्टन-  डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर अमेरिकेत सुरू झालेल्या वांशिक हिंसाचारात पहिल्यांदाच भारतीयाचा बळी गेला. बुधवारी रात्री कनसास शहरात एका निवृत्त अमेरिकी नौदल सैनिकाने  हैदराबादचे अभियंता श्रीनिवास कुचिभोटला (३२) व त्यांच्या मित्रावर गोळ्या झाडल्या. माझ्या देशातून चालते व्हा असे सांगत हल्लेखोर अॅडम पिरंटोनने दोघांवर गोळ्या झाडल्या. भारतीयांच्या समर्थनार्थ बोलणारा २४ वर्षीय अमेरिकी ईयान ग्रिलोटवरही गोळ्या झाडून पिरंटोनने त्याला जखमी केले. या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. 
 
ईयान बनला हीरो
भारतीयांना वाचवण्याचा प्रयत्न करणारा ईयान ग्रिलोट हा २४ वर्षीय अमेरिकी जगाच्या नजरेत हीरो बनला. त्याचा हात व डोक्यात गोळी लागली आहे.  तो म्हणाला, त्या वेळी कुणीही जे केले असते, तेच मी केले आहे. तो कोण आहे किंवा त्याचा वंश कोणता, हे महत्त्वाचे नाही.
बातम्या आणखी आहेत...