आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात हल्ल्याचा कट; दोषीला 15 वर्षांची कैद, डिसेंबरमध्ये कट उधळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क  - अमेरिकेत खलिस्तानवादी चळवळीला मदत करणे व भारताच्या विरोधात दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या भारतवंशीय ४२ वर्षीय बलविंदर सिंग यास अमेरिकेतील न्यायालयाने १५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.  

अमेरिकेच्या रेनो जिल्हा न्यायाधीश लॅरी हिक्स यांनी मंगळवारी बलविंदरला ही शिक्षा ठोठावली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यास दोषी ठरवण्यात आले होते. न्यायालयाने त्यास १८० महिन्यांची कैद ठोठावली आहे. देशातील अंमलबजावणी करणाऱ्या सर्व संस्थांमधील उत्कृष्ट समन्वयाचे हे आदर्श उदाहरण ठरते. त्यामुळे परदेशी दहशतवाद्यांनी देशात आपल्या कारवाया करू नये. त्या रोखण्यासाठी अशा प्रकारच्या समन्वयाची गरज आहे, असे सरकारी वकील डॅनियल बॉग्डन यांनी म्हटले आहे. सहआरोपी असलेल्या दोन जणांची भेट घेण्यासाठी बलविंदर सिंगने २०१३ मध्ये रेनो ते कॅलिफोर्नियादरम्यान प्रवासही केला होता.  

दोन साथीदारांची मदत  
बलविंदर याच्याविरोधात एफबीआय तपास करत होते. तपासात तो दोषी आढळून आला.  २०१३ मध्ये भारतात पंजाबसह विविध प्रदेशांत बलविंदरने हल्ल्यासाठी दोन साथीदारांची मदत घेतली होती. बलविंदरने त्याच्यावरील आरोप स्वीकारले आहेत. त्याच्याजवळून हल्ल्याच्या कटासंबंधी काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यात तो कट रचत असल्याचे स्पष्ट झाले आहे.  
 
डिसेंबरमध्ये कट उधळला  
दहशतवादी कट ठरल्यानंतर बलविंदर सिंगच्या एका साथीदाराला अमेरिकेच्या सुरक्षा दलाने सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. त्याची झडती घेतल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. तो बँकॉककडे निघाला होता. तेथून तो भारतात जाणार होता. परंतु अगोदर अमेरिकेच्या पोलिसांनी त्यास रोखले होते. त्या घटनेनंतरही सिंग व साथीदारांत वारंवार भेटी होत होत्या. अखेर डिसेंबर २०१३ मध्ये संशयावरून त्यास अटक केली.   
 
उपकरणांची खरेदी  
नोव्हेंबर २०१३ मध्ये बलविंदर सिंगने नाइट व्हिजन गॉगल्स, लॅपटॉप, संगणक इत्यादी खरेदी केली. या वस्तू त्याने प्रत्यक्ष कटाची आखणी करणाऱ्या एका साथीदारास दिल्या होत्या, असे तपासात बलविंदरने कबूल केले.  
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...