आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेद्दाहमध्ये हल्ला करणारा मूळचा पाकिस्तानातील, बारा वर्षांपासून जेद्दाहमध्ये वास्तव्यास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाध - सौदी अरेबियामध्ये सोमवारी रात्री उशिरा झालेल्या बॉम्बस्फोटात सहा सुरक्षा रक्षकांसह ४० निष्पाप जणांचा मृत्यू झाला होता. मुस्लीम दहशतवादी मदीना स्थित अल-मस्जिद अन -नबवी यांच्या दरवाजापर्यंत पोहोचले, जिथे पैंगबंर मुहंम्मद साहेब यांचे अंतिम विश्रांतीस्थळ आहे. जेद्दाहमधील इतर दोन हल्ले अमेरीकी वाणिज्य दूतावास आणि अल कातिफ मधील शिया मशिदीच्या बाहेर झाले. कोणीही हल्ल्याची जबाबदारी अद्याप स्वीकारली नाही. पण सौदीच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, जेद्दाहमध्ये हल्ला करणारा पाकिस्तानी होता.

गृह मंत्रालयानुसार जेद्दाहमध्ये अमेरीकी वाणिज्य दूतावासाच्या बाहेर दहशतवादी हल्ला करणाऱ्याचे नाव अब्दुल्ला कलजार खान हे असून, तो ३५ वर्षाचा आहे व पाकिस्तानी नागरीक होता. तो त्याच्या आई-वडील, पत्नी आणि कुटुंबियांसह १२ वर्षापासून जेद्दाहमध्ये राहात होता. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते जनरल मंन्सूर अल तुर्की यांनी सांगितले की ते हल्लेखोर वाणिज्या दूतावासाऐवजी मशिदीच्या अधिक जवळ होते. या हल्ल्यात हल्लेखोरासह दूतावासातील दोन सुरक्षा कर्मचारी मारले गेले.

मुस्लिम दहशतवाद्यांनी मुस्लिम धर्मातील सर्वात पवित्र मानले गेलेली अल-मशिद अन -नबवी ला देखील आपला निशाणा बनवले आणि तेदेखील मुसलमानांच्या पवित्र रमजान महिन्यात. सुरक्षा दलाने पार्किंगच्या बाजूने मशिदीत जाणाऱ्या एका व्यक्तीची शंका आल्याने त्यास रोखले तेव्हा त्याने आपल्या कमरेला बांधलेल्या विस्फोटकांचे तत्काळ बटण दाबले त्या वेळी त्याच्यासह चार सुरक्ष ारक्षक देखील यात मारले गेले आणि पाच जण जखमी झाले आहेत. अल कातिफमधील शिया मशिदीच्या बाहेर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात जवळपास २०० लोक जखमी झाले आहेत. अमेरीका आणि भारतासह ईराण, पाकीस्तानसह अनेक मुस्लीम देशांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ईराणचे परराष्ट्रमंत्री जावेद जरीफ यांनी म्हटले की, आता दहशतवाद्यांसाठी शिया-सुन्नी हा भेद संपला असून, जोपर्यंत हे दोन्ही पंथ एकत्र येत नाहीत ते पीडीतच राहतील. दहशतवाद इस्लामच्या श्रद्धास्थानापर्यंत पोहोचल्याने अधिक संताप व्यक्त होत आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...