आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमधील बँका बंद, 6 महिन्यांत 92 लाख लुटले, पैशांची चणचण भासल्याने दहशतवादी संघटनांचे हल्ले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी कारवायांच्या निषेधार्थ शुक्रवारी महिला काँग्रेसने निदर्शने केली. - Divya Marathi
पाकिस्तानी कारवायांच्या निषेधार्थ शुक्रवारी महिला काँग्रेसने निदर्शने केली.
 श्रीनगर  - जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडेच बँक लुटीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे बँकांना काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील पुलवामा, शोपियां जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक बँका बंद राहणार आहेत. काश्मीरमधील सक्रिय दहशतवादी संघटनांना पैशांची चणचण भासत असल्याने बँकांना लक्ष्य करून गेल्या सहा महिन्यांत ९२ लाख रुपये लुटण्यात आले होते.  

दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांकडून दोन डझनाहून अधिक शस्त्रे घेऊन पलायन केले आहे. नोटबंदीनंतर बँक लुटीच्या घटनांत वाढ झाली आहे. पहिल्यांदा २८ ऑक्टोबरला बँक लुटीची घटना घडली होती. पुलवामा येथील बँकेतून सात लाख रुपये लुटण्यात आले होते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये मलपोरा तसेच किश्तवाडमध्ये लूट झाली. किश्तवाडमधून चाळीस लाख तसेच मलपोरा काश्मीरमधून १४ लाख रुपये लुटण्यात आले. रतनीपोरा पुलवामामधून ११ लाख रुपयांची लूट झाली. फेब्रुवारीमध्ये शोपिया बँकेतून ३, बडगाममधून दोन लाख रुपये लुटण्यात आले. एप्रिलमध्येही अशीच एक घटना घडली होती. अनंतनागमध्ये बँक लुटण्यासाठी आलेल्या दोनपैकी एका दहशतवाद्यास अटक केली होती. मेच्या पहिल्या आठवड्यात अशा पाच मोठ्या घटना घडल्या.  
 
बँक लुटण्यासाठी नवीन  दहशतवादी झाले सक्रिय-  
नोटबंदीने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. दहशतवाद्यांना पैशांची चणचण भासू लागल्याने लुटालूट सुरू करण्यात आली आहे. सर्व घटनांमध्ये पहिल्यांदा बँकांची लूट करण्यात आली. याअगोदर काश्मीरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत नसत. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, दहशतवादी कारवायांसाठी संघटना आता नवीन दहशतवाद्यांचा वापर करू लागल्या आहेत. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर संघटनेत सामील झालेल्या दहशतवाद्यांचा बँक लुटीसाठी वापर होत आहे.  
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...