आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध पाकिस्तानी लेखिका बानो कुदसिया यांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - पाकिस्तानच्या प्रसिद्ध लेखिका बानो कुदसिया यांचे शनिवारी निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. हृदयविकारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. पती अशफाक अहमद यांच्या कबरीशेजारीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.कुदसिया पाकिस्तानमध्येच नव्हे तर जगभरातील उर्दू साहित्यातील जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांचा जन्म १९२८ मध्ये भारतातील फिरोजपूरमध्ये झाला होता. फाळणीनंतर त्या पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. 
 
बातम्या आणखी आहेत...