आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाेबामांनी शेअर केल्या नेतृत्वाच्या टिप्स; म्हणाले- सेल्फी काढू नका, हस्तांदाेलन करा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिकागाे- अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक अाेबामा यांना सेल्फी काढणे व काढून घेणे मुळीच अावडत नाही. ते स्वत:ही सेल्फी काढत नाहीत व इतरांनी त्यांच्यासाेबत सेल्फी काढणेदेखील त्यांना पसंत नाही. एका कार्यक्रमात तरुणांशी बाेलताना त्यांनी सांगितले की, त्यांची पत्नी मिशेल अाेबामादेखील सेल्फीपासून दूरच राहतात. अमेरिकेतील शिकागाे येथे बराक व मिशेल अाेबामा फाउंडेशनच्या पहिल्या संमेलनाचे अायाेजन नुकतेच करण्यात अाले हाेते. त्यासाठी जगभरातील ५०० तरुण लीडर्स व सुमारे ६० देशांचे विविध क्षेत्रांतील कलाकार अाले हाेते. मात्र, या संमेलनात अाेबामांनी सेल्फी घेण्यास बंदी केली हाेती. या वेळी अाठ वर्षे राष्ट्रपती राहिलेल्या त्यांनी नेतृत्वासंबंधीच्या टिप्स शेअर केल्या...
 
 
‘सर्वांचे एेका; ज्यांच्याशी सहमत नसाल त्यांच्यासाठीही बुद्धीची कवाडे खुली ठेवा ’
नेतृत्वगुणाबाबत माझे केवळ चार नियम असून, ते खूप साधे व सरळ अाहेत. पहिला नियम हा अाहे की, तुमच्या अाजूबाजूला असणाऱ्यांचे एेका. त्यांच्याशी तुमच्या कथा शेअर करा, त्यांच्या कथाही एेका. शक्य झाल्यास अापल्या अाजूबाजूला असलेल्या अशा व्यक्तीची निवड करा, जी तुमच्यासारखी नसेल. त्यांची विचारशैली व अनुभव वाचण्याचा प्रयत्न करा. दुसरा नियम- तुम्ही भलेही काेणाशी सहमत नसाल; परंतु त्यांच्यासाठीही तुमच्या बुद्धीची कवाडे खुली ठेवा. जडतेने बदल हाेत नाही. काेणाशी असहमत असाल तरीही त्यांच्याशी बाेला. तसेच कल्पना अवश्य शेअर करा. राजकारणासाठी नव्हे, तर सभ्यतेसाठी हे गरजेचे अाहे. तिसरा नियम- काम एन्जाॅय करा. काेणतेही काम हे कठीणच असते. त्यात कधी-कधी अपयशही मिळते. त्यामुळे राग येताे; परंतु यादरम्यान कामाचा अानंद घेणे खूप अावश्यक अाहे. 
 

यासह लहान-लहान यशांचा अानंदही घ्या. चाैथा व शेवटचा नियम- नाे सेल्फी. त्याएेवजी हस्तांदाेलन करा, चर्चा करा. मिशेललाही माझा हा गुण माहीत अाहे. तीदेखील सेल्फीपासून दूर राहते.  -बराक अाेबामा
बातम्या आणखी आहेत...