आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीसीच्या मतदानात बीसीसीअाय तोंडघशी! महसूल आणि संचालनाच्या मतदानात झाला पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - जागतिक क्रिकेटमध्ये भारताच्या साम्राज्याला बुधवारी जोरदार धक्का बसला.  आयसीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालन पद्धत आणि महसूल मॉडेलवर झालेल्या मतदानात जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) लाजिरवाणा पराभव झाला. भारताच्या पराभवाचा पाया बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी तयार केला होता, असे म्हटले जाते. मनोहर हे आयसीसीचे स्वतंत्र चेअरमन होते. 
 
बीसीसीआयचा  पहिला पराभव : संचालन पद्धतीत बदलाच्या बाजूने ९-१ ने मतदान झाले. बीसीसीआयने याच्याविरोधात मतदान केले होते. बीसीसीआयला स्वत:चेच मत (अमिताभ चौधरी) मिळाले.  
 
बीसीसीआयचा दुसरा पराभव : वर्तमान महसूल मॉडेलप्रकरणी बीसीसीआयचा ८-२ ने पराभव झाला. वर्तमान महसूल पद्धतीत इंग्लंड-ऑस्ट्रेलिया-भारताचे वर्चस्व आहे. हे वर्तमानातील मॉडेल कायम राहावे यासाठी बीसीसीआयचा आग्रह होता. बीसीसीआयला फक्त श्रीलंकेचे समर्थन मिळाले.   

पराभवाचे कारण : आयसीसीच्या संचालन मॉडेलमध्ये दोन्ही बदलांना विरोध करणारा भारत एकमेव देश आहे. वादाचे मोठे प्रकरण हे महसुलाचे आहे. यात भारताचा वाटा ५७ कोटी डॉलरहून आता निम्मा होईल. बीसीसीसीआयला हे अमान्य होते.   
 
शशांक मनोहरांचे समर्थन नाही : शशांक मनोहर यांनी बिग थ्रीच्या मॉडेलला विरोध करताना महसूल सर्व देशांत एकसारखा वितरित करण्याची बाजू घेतली होती. आधीच्या मॉडेलमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडला अधिक महसूल मिळत होता. फक्त तीन देशांचेच क्रिकेट महसुलावर वर्चस्व का?  क्रिकेट खेळणाऱ्या सर्वांचा यावर हक्क आहे, असे मनोहर यांचे म्हणणे होते.  
 
आता पुढे काय ?  
१ जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. बीसीसीआय एकमेव संघटना आहे, जिने अजून आपला संघ जाहीर केलेला नाही. २५ एप्रिल हा संघ जाहीर करण्याची अखेरचा दिवस होता. आता आयसीसीत झालेल्या पराभवानंतर बीसीसीआय या स्पर्धेत संघ पाठवेल की नाही याबाबत शंका आहे. मात्र, बीसीसीआयने लवकरच संघ जाहीर करण्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...