आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक समस्या: काळा पैसा परदेशात जाणाऱ्या आघाडीच्या पाच देशांत भारत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन / वॉशिंग्टन- सर्वाधिक काळा पैसा परदेशात जाणाऱ्या टॉप-५ देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. सर्वाधिक काळा पैसा चीनमधून जातो. त्यानंतर रशिया, मेक्सिको, भारत आणि मलेशियाचा क्रमांक लागतो. भारतात काळा पैसा परत आणण्याचे राजकीय आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नसल्याच्या पार्श्वभूमीवर ही बातमी धक्कादायक आहे.

वॉशिंग्टनच्या ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटीने जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि अनेक देशांच्या सरकारकडून जारी आकड्यांचे विश्लेषण करून हा दावा केला आहे. संस्थेने २००३ ते २०१२ दरम्यान देशातून बाहेर गेलेल्या काळ्या पैशाचा प्रवाह कसा होता त्याचे सखोल अध्ययन केले. त्यात सरासरी १० टक्क्यांनी वार्षिक वाढ होत असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. विकसनशील देशांना विकासकार्यासाठी मिळणारा परदेशी निधी आणि थेट परदेशी गुंतवणुकीपेक्षाही बाहेर जाणाऱ्या काळ्या पैशाचा आेघ फार मोठा असल्याचा दावा बीबीसीच्या वृत्तातून करण्यात आला आहे. काळा पैसा पाठवणाऱ्या देशांत चीन, रशिया, मेक्सिको, भारत, मलेशिया पहिल्या पाच देशांत समाविष्ट होतात. गेल्या दहा वर्षांत ४० टक्के एवढा बेकायदा पैसा याच देशांतून बाहेर आल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

लंडन हवाला केंद्र
ब्रिटनमध्ये काळ्या पैशांनी मालमत्ता खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली असून त्यातून लंडन हवाला केंद्र बनले आहे. ही ब्रिटन सरकारसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या खरेदी व्यवहारातून येणाऱ्या पैशाचा प्रवाह रोखण्याचे संकेत पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी दिले आहेत. बनावट प्रॉपर्टी कंपनीच्या माध्यमातून अशी मालमत्ता खरेदी केली जाते. अशा बनावट कंपन्या देशातील कर चुकवण्यासाठी चुकीच्या मार्गाने आलेला पैसा बाहेर पाठवण्यासाठी आपल्या गुप्त मालकांची मदत घेतात.

जीडीपीच्या किती टक्के?
सकल घरेलू उत्पन्नाच्या पातळीवर काळा पैसा बाहेर जाण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याचे अहवालावरून स्पष्ट होते. आशिया- ३.७५ टक्के, युरोप- ४.४५ टक्के, मध्यपूर्व -उत्तर अमेरिका- ३.७३ टक्के, अमेरिका-३.३, आफ्रिका- ५.५३ टक्के

खर्व कसे समजून घ्याल ?
सेकंदाला एक अंक अशा पद्धतीने हिशेब केल्यास सुमारे ३१ हजार ७०९ वर्षे खर्व संख्या मोजण्यास लागतील. ८६ मोठ्या कंपन्यांच्या नफ्याची बरोबरी करणारी ही संख्या आहे.
६. ६ खर्व डॉलर एवढा गेल्या दहा वर्षांतील बाहेर जाणारा विकसनशील देशांचा पैसा.
०१ खर्व डॉलर दरवर्षी विकसनशील देशांतून बाहेर जाणारा काळा पैसा.
बातम्या आणखी आहेत...