आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियाच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या अलेप्पो शहरातून पळाले अतिरेकी; खेळण्यांत लपवले होते बॉम्ब आणि ग्रेनेड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलेप्पो - सिरियाच्या अलेप्पो या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहराच्या पूर्व भागातून इसिसच्या दहशतवाद्यांचा सफाया झाल्यानंतर लष्कराच्या शोधमोहिमेत रोज शस्त्रास्त्रे मिळत आहेत. एका शाळेतही असेच घडले. तेथे रशियन लष्कराच्या मोहिमेत मुलांच्या खेळण्यांत लपवून ठेवलेले ग्रेनेड जप्त करण्यात आले. रशियन लष्कराच्या जवानाने एका बाहुलीचा मागील भाग कापला तेव्हा त्यात ग्रेनेड मिळाले. ते त्वरित नष्ट करण्यात आले. लष्कराला लक्ष्य करूनच बॉम्ब पेरला होता. अशाच एका घटनेत तीन मुलांसह २३ जणांचा मृत्यू झाला आहे.  
 
डिसेंबरमध्ये अतिरेक्यांना लष्कराने हटवले होते  
गेल्या वर्षी २२ डिसेंबरलाच अमेरिकी आणि रशियन लष्कराच्या पाठिंब्याने अध्यक्ष असद यांच्या सैन्याने या भागातून अतिरेक्यांना पळवून लावले होते. अतिरेकी पळाल्यानंतर लष्कराने अवैध शस्त्रास्त्रे ताब्यात घेण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली आहे.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...