आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचे शब्द एेकताच बालक कोमातून बाहेर, चीनच्या हुबेई प्रांतातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या हुबेई प्रांतातील यिचांग या गावी चमत्कारिक घटना घडली. येथे राहणारी हुआे लिंग सँग व तिच्या कुटुंबीयांकडे फारसा पैसा नाही. त्यांची मासिक कमाई ५००० युआन(५१, ९९७ रुपये ) आहे. मात्र या कुटुंबाची इच्छाशक्ती व चिकाटी थक्क करणारी आहे. विशेषत: हुआेचे मनोबल फारच भक्कम आहे. तिच्यासमोर डॉक्टरांनीही हार मानली.
सर्व डॉक्टरांनी सल्लामसलत केली. मात्र त्यांचे चूकच आहे, यावर हुआे ठाम होती. १९८ दिवसांनंतर तिने तिच्या मुलाला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलेच. तिचा मुलगा यू पिंजिया थ्री जॉर्ज विद्यापीठात द्वितीय वर्षाला शिकतो. घरात व मित्रपरिवारातही तो लाडका. मात्र २५ मार्चचा दिवस त्याच्यासाठी दुर्दैवी ठरला. त्या दिवशी तो महाविद्यालयात नृत्य करत होता. त्यादरम्यान पडला. ब्रेन हॅमरेज झाले. महाविद्यालय व्यवस्थापनाने त्याला तत्काळ रुग्णालयात हलवले. घरी सूचना पोहोचली. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच पिंजिया कोमात गेला. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. अॅक्युपंक्चर व हायपर बॅरिक ऑक्सिजन चेंबरचाही वापर केला. एका रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले नाही म्हणून दुसऱ्या व नंतर तिसऱ्या रुग्णालयातही त्याला हलवण्यात आले. मात्र पिंजियाने डोळे उघडले नाहीत. डॉक्टरांनी सर्व आशा सोडल्या. तो कधीच डोळे उघडणार नाही असे सांगितले. परिचितांनी तर हुआे व त्यांचे पती यांना दुसरे अपत्य जन्माला घालण्याचा सल्ला दिला. पिंजिया परतणार नाही, असेच सगळे जण सांगत होते. मात्र आईने आशा सोडली नाही. हार मानली नाही. हुआे दररोज मुलाची मालिश करत. त्याला आवडीच्या कथा व गाणी ऐकवत. त्याच्यासमोर लहानपणीच्या आठवणी सांगत बसत. त्याला आठवण करून देत, ‘तू मोठा झाल्यावर माझी व वडिलांची काळजी घेणार आहेस. तू वचन दिले आहेस.’ आम्ही दोघेही त्या दिवसाची वाट पाहत आहोत. अखेरीस तिच्या प्रयत्नांना यश आले. आईवडिलांची काळजी घेण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी पिंजिया पुन्हा जागा झाला. ९ ऑक्टोबरला त्याला शुद्ध आली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..