आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ब्रिटिश रॉयल बँके’त रोजगार देण्याआधी वाचतात मेंदू, उमेदवारांना घालण्यासाठी दिल्या जातात ‘माइंड रीडिंग ब्रेन कॅप्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- प्रभावी अर्ज, विजेत्याप्रमाणे हास्य आणि प्रतिष्ठित बिझनेस स्कूलमधून पदवी मिळवल्यानंतरही मुलाखतीदरम्यान तुमच्या मेंदूमध्ये दुसरा विचार सुरू असेल तरी इंग्लंडमधील सर्वात मोठी बँक तुम्हाला रोजगार देण्यास नकार देऊ शकते. रॉयल बँक आॅफ स्कॉटलंड (आरबीएस) उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान विशिष्ट प्रकारच्या “माइंड रीडिंग कॅप’ - ब्रेन स्कॅनर्सचा वापर करत आहे. बँकेच्या वतीने सर्व विद्यापीठांत तसेच रोजगार मेळाव्यांत हीच पद्धत वापरण्यात येत आहे.
  
संभावित उमेदवारांना ही ब्रेन कॅप घातली जाते. त्यानंतर त्यांना काही व्हिडिओ आणि छायाचित्रे दाखवली जातात. उमेदवारांच्या मेंदूच्या वतीने देण्यात आलेल्या प्रतिक्रियेच्या आधारावर त्या व्यक्तीच्या व्यक्तित्वाची माहिती मिळते. त्यावरून तो उमेदवार कोणत्या पद्धतीचे काम करू शकतो किंवा कोणत्या पद्धतीचे काम योग्य पद्धतीने करू शकेल याचाही अंदाज घेतला जातो. उमेदवारांचे मूल्यांकन करण्यासाठी गेमिफिकेशन आणि ऑनलाइन सिम्युलेशन हा नवीन टूल असून हा बँकांना योग्य उमेदवार निवडण्यासाठी मदत करतो त्याचबरोबर महत्त्वपूर्ण फीडबॅकदेखील देत असल्याचे मत आरबीएसचे मुख्य माहिती अधिकारी पॅट्रिक अॅल्ट्रिज यांनी व्यक्त केले. यामुळे बँकांना योग्य उमेदवार निवडण्यासाठी मदत होते. विशेषकरून तंत्रज्ञानात शिक्षण झालेले उमेदवार जे स्टार्टअप्समध्ये काम करण्यास इच्छुक नसून बँकेसोबत काम करण्यासाठी योग्य आहेत, असे उमेदवार निवडण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल आणि नेट बँकिंगमध्ये होत असलेली वाढ, लोकांचे अनेकदा होणारे स्थलांतर आणि सायबर धोक्यामुळे बँकांना तंत्रज्ञानात तज्ज्ञ युवकांची आवश्यकता भासत आहे. यामुळे ड्यूश बँकेने गेल्या दाेन वर्षांत पदवीधरांची भरती दुपटीने वाढवली आहे. जेजी मॉर्गन अँड चेननेदेखील तंत्रज्ञानाची जास्त माहिती असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यास सुरुवात केली आहे. 

बँक दरवर्षी ६१ हजार २०० कोटी रुपये तंत्रज्ञानावर खर्च करत आहे. यामध्ये सर्वाधिक पगार डेव्हलपर्स आणि सायबर सिक्युरिटीजमधील तज्ज्ञ असलेल्यांना देण्यात येत आहे. तर बँक आॅफ अमेरिकेचा तंत्रज्ञानावरील वार्षिक खर्च २० हजार ४०० रुपये आहे. ज्या उमेदवारांचे 
फोकस सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगवर असेल असेच उमेदवार घेण्यावर आमचे लक्ष केंद्रित असल्याची माहिती लंडनमधील ड्यूश बँकेचे आयटी प्रमुख स्कॉट मार्कार यांनी दिली. 

फक्त तंत्रज्ञानावर आधारित संस्थाच नाही, तर बँकिंग क्षेत्रातील स्टार्टअपदेखील युवकांमध्ये कडक प्रतिस्पर्धी घेत तरुण उमेदवारांची निवड करत असल्याचे तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनीही मान्य केले आहे. याच वर्षी सुरू झालेले मोन्जो बँकेचे टॉम ब्लोमफील्ड स्वत: टेक्नॉलॉजिस्ट असून ते म्हणाले की, आम्ही मोठ्या बँकेतील प्रशिक्षित तंत्रज्ञांचा शोध घेण्याऐवजी नवीन उमेदवारांना बँकेत संधी देऊन त्यांना कायम टिकवण्यासाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या वापरत आहोत. त्यांच्या बँकेला २०१६ मध्येच बँक आॅफ इंग्लंडच्या वतीने परवानगी मिळाली आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...