आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात मोठ्या बौद्ध विद्यापीठावर चीन चालवतोय बुलडोझर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- हे विद्यापीठ पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. १९८० मध्ये स्थापन झालेल्या विद्यापीठात टीव्हीवर बंदी आहे, पण बहुतांश बौद्ध भिक्खूंजवळ आयफोन आढळतात. - Divya Marathi
- हे विद्यापीठ पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. १९८० मध्ये स्थापन झालेल्या विद्यापीठात टीव्हीवर बंदी आहे, पण बहुतांश बौद्ध भिक्खूंजवळ आयफोन आढळतात.
बीजिंग - हे छायाचित्र जगातील सर्वात मोठ्या बौद्ध विद्यापीठाचे आहे. ते चीनच्या सिचुआन प्रांतात आहे. ३ हजार भिक्खू सुमारे ९ हजार तिबेटी विद्यार्थ्यांना शिकवतात. चीनने दाट लोकसंख्येचा हवाला देत वस्ती रिकामी करण्यास सांगितले आहे. बुलडोझरही लावले आहेत. लंडनच्या फ्री तिबेट ग्रुपचे म्हणणे आहे की, बौद्ध धर्माचा प्रभाव कमी करण्याचा चीनचा इरादा आहे. असे बुलडोझर चीनच्या इतर दाट वस्तीच्या भागावर का चालवले जात नाहीत?  
 
६ महिन्यांत ४६०० लोकांना हटवले  
६ महिन्यांत १५०० घरे पाडून ४६०० लोकांना हटवले आहे. त्याला युरोपियन संघटनेने (ईयू) आक्षेप घेतला आहे. ईयूचे राजदूत २२ जूनला विद्यापीठात गेले होते. हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. चीनने दलाई लामांशी चर्चा सुरू करावी, असे त्यांचे म्हणणे आहे.  
बातम्या आणखी आहेत...