आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनची इच्छापूर्ती : थायलंडशी बुलेट ट्रेनचा झाला करार, 2022 मध्ये धावणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - जलदगती बुलेट ट्रेनच्या क्षेत्रात चीनला माेठे यश मिळाले आहे. चीन व थायलंड यांच्यात एक करार झाला आहे. त्यासाठी थायलंडने ५.५ अब्ज डाॅलर्सच्या या कराराला मंजुरी दिली आहे. त्याचा उपयाेग बँकाॅकला दक्षिण चीनसाेबत जाेडण्यासाठी हाेणार आहे.  
 
चीनने भाैगाेलिक प्रदेशातील पायाभूत सुविधांत वाढ करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत कुनमिंग शहर लाआेस, थायलंड, मलेशिया व सिंगापूरशी जाेडता येणार आहे, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यातून चीन-थायलंडमधील संपर्कात आणखी वेग येऊ शकतो. त्याचा फायदा नागरी  संपर्काबरोबरच व्यापारातही होणार आहे, असा विश्वास चीनने व्यक्त केला आहे.  
 
लाआेसमध्ये बांधकामाला सुरुवात :  दोन्ही देशांतील प्रकल्पाला अगोदरच सुरुवात झाली आहे. लाआेसमध्ये बुलेट ट्रेनसाठी आवश्यक बांधकामाला सुरुवात झाली आहे, परंतु थायलंडमध्ये काही आर्थिक अडचणी होत्या. त्यात कर्जाच्या अटी, कामगारांचे प्रश्न या पातळीवर थायलंड सरकारला पुढचे पाऊल टाकताना अडचणी जाणवत होत्या, परंतु आता अडचणी दूर झाल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 
 
दरम्यान, चीनमध्ये बुलेट ट्रेनचे मोठे जाळे आहे. देशातील अनेक शहरे बुलेट ट्रेनने जोडली गेलेली  आहेत. अशाप्रकारचे चीनमध्ये जगातील सर्वात मोठे जाळे आहे. सुमारे २२ हजार किलोमीटरचे हे जाळे आहे.  
 
२०२२ मध्ये धावणार  :  चीनने सर्व तयारी केली आहे. थायलंडने देखील या करारासाठी आता तयारी दाखवली आहे. म्हणूनच प्रकल्पाच्या कामाची गती चांगली राहिल्यास हायस्पीड ट्रेन प्रत्यक्षात २०२१ मध्ये धावू शकेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
 
राजकीय महत्त्वाकांक्षा  
चीनने बुलेट ट्रेनच्या क्षेत्रात जपानशी स्पर्धा सुरू केली आहे. म्हणूनच थायलंडची ऑर्डर मिळाल्यानंतर चीनने समाधान व्यक्त केले आहे. चीन नवी दिल्ली-चेन्नई मार्गावरील जलदगती रेल्वेची ऑर्डर मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी अभ्यासही सुरू केला. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची ऑर्डर जपानला मिळाल्यानंतर चीनने नाराजी व्यक्त केली होती. 
बातम्या आणखी आहेत...