आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांच्या मुलींना बुश कन्येचे पत्र, डिअर साशा व मालिया, आपल्या मनाचे ऐका...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालिया आणि साशा, आठ वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्याच्या एका कुडकुडत्या थंडीच्या सकाळी व्हाइट हाऊसच्या पायऱ्यांवर आम्ही तुमचे स्वागत केले. तुम्ही जेव्हा तुमच्या नव्या घराकडे पाहत होता तेव्हा तुमच्या डोळ्यात आम्ही चमक आणि सतर्कता पाहिली. आम्ही बाल्टीमोर आणि न्यूयॉर्कमध्ये काम सोडून तुम्हाला व्हाइट हाऊस दाखवण्यासाठी वॉशिंग्टनला आलो होतो. तुम्हाला लिंकन बेडरूम आणि इतर शयनगृहे दाखवायची होती जी कधीकाळी आमची होती. तुमचा स्टाफशी परिचय करून देण्यासाठी आम्ही आलो होतो, जो या ऐतिहासिक
इमारतीला घरासारखे रूप देण्यासाठी समर्पित आहे. 
 
आठ वर्षांत तुम्ही खूप काही पाहिले आहे.  रोबेन द्वीपच्या तुरुंगातील त्या खोलीच्या दरवाजाजवळ तुम्ही उभ्या होता. तेथे नेल्सन मंडेला अनेक वर्षे कैदेत होते. तुम्ही आपल्या आईसमवेत मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी लायबेरिया आणि मोरक्कोला गेला होतात. मुलींना तुमच्यात, तुमच्या माता-पित्यात आपली झलक पाहिली. त्यांनी पाहिले की शिकत राहिल्यास त्या तुमच्यासारख्या बनू शकतात. आम्ही तुम्हाला सभ्यतेने प्रभावशाली तरुणी बनताना पाहिले आहे.
 
आता तुम्ही एका दुर्लभ क्लबमध्ये (माजी राष्ट्रपतींची मुले) सहभागी होण्यासाठी जात आहात. ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल. तुम्ही आपल्या सुप्रसिद्ध पालकांच्या छायेतून हटून आपल्या जीवनाची गाथा स्वत: लिहाल. तरीही तुमच्या समवेत गेल्या आठ वर्षांतील अनुभ राहतील. व्हाइट हाऊसमध्ये काम करणाऱ्या शानदार लोकांना कधीच विसरू नका. आम्ही आपल्या गुप्तचर सेवेच्या लोकांच्या संपर्कात असतो. ते आपली पहिली डेट,  पहिला दिवस,  इतकेच काय साखरपुडा आणि मधुचंद्राच्या वेळीही ते आमच्यासोबत असतात. महाविद्यालयीन जीवनाचा  आनंद घ्या. आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करा. तुम्ही काय आहात हे जाणून घ्या. त्या प्रामाणिक मित्रांसमवेत राहा, जे पूर्ण ताकदीने तुमचे संरक्षण करत आहेत. आपल्या मनाचे एेका. पालकांसमवेत भ्रंमती करून आम्ही अनेक गोष्टी शिकल्या आहेत.   या नव्या प्रवासात नवीन माणसे, नवीन संस्कृती आणि नव्या कल्पानांनी आमचे डोळे उघडले आहेत. तुम्ही व्हाइट हाऊसचा अविश्वसनीय दबाव झेलला आहे. आपल्या माता-पित्यांवरील टीका ऐकली आहे. तुमचे माता-पिता वृत्तपत्रातील मथळ्यात झळकले. तुम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिलात. 
 
जेना बुश हेगर, बार्बरा बुश