लुईसव्हिले - अमेरिकेत केंटुकी येथे एका माथेफिरू माणसाने आपल्या आई आणि गर्लफ्रेंडला ठार मारल्यानंतर ग्रामीण भागातील आपल्या घरात स्वत:ला कोंडून घेतले आणि गोळीबार करून डेप्युटींची प्रतीक्षा करीत बसला, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात अग्निशामक दलाचा एक डेप्युटीही चांगलाच भाजला आहे, अशी माहिती अॅथाॅरिटीने दिली आहे.
त्यानंतर त्याने स्वत:वर बंदूक रोखण्याअगोदर घरासह स्वत:लाही आगीच्या हवाली केले. तदनंतर यामध्ये ती व्यक्तीदेखील आगीत गंभीर भाजली आणि गतप्राण झाली. त्यामुळे त्या व्यक्तीला काल फ्रंॅकफर्ट येथे ओळखणे अवघड झाले होते. रोवन काउंटीचे कोरोनर जॉन पी नॉर्थकट म्हणाले की, प्राथमिक चौकशीत कळते की ५१ वर्षीय गॅरी मॉरिसन हे स्वत:च त्यांनीच बंदुकीने मारलेल्या गोळीने गतप्राण झाले. थोडक्यात निष्कर्षांत हे सिद्ध झाले की, त्या माथेफिरूने स्वत:लाच संपवले. त्यानंतर त्यानेच लावलेल्या आगीत तो गंभीरपणे भाजला गेला त्यामुळे नक्की तो कसा निधन पावला यावर प्रकाश पडला आहे.