आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅलिफोर्नियात अनेक जंगलांत वणवा, आगीत काही लोक जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
लॉस एंजलिस - कॅलिफोर्नियातील वनक्षेत्र पेटले असून आग विझविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अग्निशमन दलाचे सुमारे २ हजार ३०० सैनिक कार्यरत आहेत. वणव्यामुळे प्रदेशातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे या प्रदेशात दुष्काळ मुक्कामी राहू शकतो.  
 
राज्याच्या उत्तरेकडील सिएरा नेवाडा वन क्षेत्रात ही आग लागली आहे. शनिवारी दुपारपर्यंत या वणव्याने मोठे क्षेत्र व्यापले होते. आगीच्या मोठ्या लोळांमध्ये झाडांबरोबर दहा घरांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण वनक्षेत्र सुमारे २ हजार एकर एवढे विस्तीर्ण आहे. परंतु अद्याप या भागातील नागरी वस्तीला योग्य पद्धतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले नाही. काही लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु ही संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे प्रशासनाचे काम ढिम्मपणे सुरू आहे, असे दिसते.  
 
आगीत काही लोक जखमी : वन क्षेत्रातील मानव वस्तीला हटवण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु वणवा भडकल्याने या भागातील पाच रहिवासी किरकोळ जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
मोठ्या वन क्षेत्रावरील अनेक वणव्यांमुळे परिसरातील मानवी वस्ती असलेल्या प्रदेशाचे तापमानही कमालीचे वाढले आहे. त्याचा परिणाम मानवी जीवनावर होऊ शकतो, असा इशारा
नॅशनल व्हेदर सर्व्हिसने (एनडब्ल्यूएस) दिला आहे.  
 
उष्ण व कोरडी हवा  : वणव्यामुळे सांता बार्बरा प्रदेशातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दुसरीकडे सांता बार्बरा भागातील वनक्षेत्र सुमारे ५ हजार ७५० एकर भागात पसरलेले आहे. वणवा या भागात पसरून जीवित हानीचा धोका होऊ शकतो. वणव्यामुळे प्रदेशात शनिवारी रात्री उष्ण व कोरडी हवा वाहू लागली.  
 
सतरा वणवे  : सिक्स रिव्हर्स नॅशनल फॉरेस्ट या उत्तरेकडील प्रदेशापासून लॉस एंजलिसजवळील पूर्वेच्या सॅन बर्नार्डिनो फॉरेस्टपर्यंत विविध वन क्षेत्रांत वणवे पाहायला मिळत आहेत. ही नैसर्गिक समस्या अमेरिकेच्या प्रशासनापुढील डोकेदुखी ठरली आहे.  
बातम्या आणखी आहेत...