आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाशी संबंधाचे प्रकरण : ट्रम्प यांची जावयाला वाचवण्याची धडपड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर यांनी रशियाशी पडद्याआड चर्चा केली होती, असे वृत्त अमेरिकेतील दोन प्रमुख वृत्तपत्रांनी दिले आहे. त्यानंतर अमेरिकेत कुशनर आणि ट्रम्प यांच्याविरोधात वातावरण तापले आहे. स्वत: ट्रम्प आणि व्हाइट हाऊस कुशनर यांच्या बचावासाठी उघडपणे मैदानात उतरले आहेत. ट्रम्प यांनी याबाबत प्रमुख वकिलांशीही सल्लामसलत केली आहे.  

ट्रम्प यांनी न्यूयॉर्क टाइम्सला एक निवेदन पाठवून जॅरेड यांची स्तुती केली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, हे सगळे बनावट बातमीमुळे घडले आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘माझ्या मते व्हाइट हाऊसमधून येणारी ही खोटी लीक माध्यमांनी खोट्या कहाण्यांच्या आधारे तयार केली आहे. जेव्हा बातमीत नाव नसेल, सूत्रांचे नाव नसेल तेव्हा ही बातमी खोटी बातमी देणाऱ्याने लिहिली असावी, हे निश्चितपणे समजून घ्यावे. खोट्या बातम्या म्हणजे शत्रूच. बनावट बातम्यांमुळेच अमेरिकेच्या लोकांना खरी माहितीच मिळत नाही.  
 
विदेशी शक्तींशी पडद्याआड संपर्क सामान्य बाब : मॅकमास्टर  
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मॅकमास्टर यांनी म्हटले आहे की, आम्ही अनेक देशांशी पडद्याआड चर्चा करत आलो आहोत. मंत्री जॉन केली यांच्या मते, विदेशी शक्तींसोबत पडद्याआड संपर्क कायम करणे ही सामान्य परंपरा आहे. ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर कुशनर यांनी रशियाचे राजदूत किस्लयार यांच्याशी ट्रम्प टॉवरमध्ये भेट घेतली होती. ते म्हणाले होते, रशियाशी चर्चा करण्यासाठी रशियाच्या राजनैतिक चॅनलचा उपयोग केला जावा म्हणजे अमेरिकी गुप्तहेर व प्रशासनाला त्याची माहिती मिळू नये. अर्थात कोणत्याही चॅनलचा उपयोग करण्यात आला नाही.
 
- जॅरेड देशासाठी खूप मोठे काम करत आहेत. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. जवळपास प्रत्येक वर्गात त्यांना सन्मान आहे. ज्या कार्यक्रमांवर ते काम करत आहेत त्या कार्यक्रमांमुळे आपल्या देशाचे अब्जावधी डॉलर वाचतील. या सर्वांहूनही वरचढ म्हणजे, ते खूप चांगली व्यक्ती आहेत.  
- डोनाल्ड ट्रम्प
 
बातम्या आणखी आहेत...