आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलंडमध्ये कॅथॉलिक चर्चमधील भिंती व गर्भगृह 30 हजार लोकांच्या कवट्यांनी मढवलेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुडोवा- हे छायाचित्र पोलंडच्या सेंट बर्थोलोमेव चर्चचे आहे. कुडोवा शहरातील या चर्चची स्कल चापेल अशी आेळख आहे. चर्चच्या आतील भागात प्रार्थनेच्या ठिकाणी असलेल्या भिंती कवट्या आणि अस्थींनी मढवलेल्या आहेत. झेक प्रजासत्ताकच्या सीमेलगतच्या पर्वतरांगेत हे अनोखे कॅथॉलिक चर्च आहे. फादर रोमॅल्डड ब्रुदनोस्की यांनी बुधवारी १०० हून अधिक सहकाऱ्यांच्या मदतीने वार्षिक विधी पूर्ण केला. ते म्हणाले, ‘येथे हजारो अज्ञात लोकांसाठी मी रोज प्रार्थना करतो. त्यांच्यावर ईश्वराने दया दाखवावी, ही माझी ईश्वराला प्रार्थना आहे. २०० हून अधिक वर्षांपासून हे लोक कल्याणाची इच्छा बाळगून आहेत.’
 
 
महामारी, युद्धात मृत्यू झाला होता
फादर म्हणाले, १७७६ पर्यंत महामारी व युद्धामुळे सुमारे ३० हजारावर लोकांचा मृत्यू झाला होता. दफन लोकांना योग्य सन्मान देण्यासाठी १८०४ मध्ये हे चर्चची स्थापना झाली.
 
३ देशांतील लोकांच्या अस्थींचे जतन
झेक प्रजासत्ताक, जर्मनी व ऑस्ट्रियाच्या सैनिकांच्या अस्थींचा चापेलमध्ये समावेश आहे. या अस्थींना धर्मस्थळी भिंतींवर सजवण्याचा विचार कबर खोदणाऱ्या जे. लँगर यांच्या मनात आला होता. त्यांनी जे. श्मीड यांच्या मदतीने या अस्थींची साफसफाई केली. त्यासाठी त्यांना १८ वर्षे लागली होती.
 
तळघरात २५ हजार लोकांच्या अस्थी
चर्चमध्ये प्रार्थनास्थळी भिंतींवर ३ हजार कवट्या लावण्यात आलेल्या आहेत. तळघरात सुमारे २५ हजार लोकांच्या अस्थी आहेत. पोलंडमधील हे एकमेव अस्थी चर्च आहे.
 
रोम व झेक प्रजासत्ताकमध्येही बोन चर्च 
पोलंडशिवाय इटलीची राजधानी रोमच्या कॅटकाँबस व झेक प्रजासत्ताकच्या कुटना होरामध्येही बोन चर्च आहेत.
 
पुढील स्‍लाईडवर पहा बाहेरून अशी आहे बर्थोलोमेव चर्चची इमारत....
बातम्या आणखी आहेत...