आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदला घेण्यासाठी अमेरिकी व्यापाऱ्याने नोंदणी शुल्कापोटी दिली 3 लाख नाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे अमेरिकेतील व्यावसायिक निक स्टॅफोर्ड असून त्यांची चार घरे आहेत. मुलाच्या गाडीची नोंदणी कोणत्या पत्त्यावर करणे योग्य ठरेल यासाठी त्यांनी परिवहन विभागाला फोन केला. ग्राहक सेवा केंद्राशी त्यांची चर्चा सुरू होती. मात्र, त्यांना सरळ विभागाशी बोलायचे होते. मात्र, तसे झाले नसल्याने त्यांनी विभागाविरोधात तीन याचिका दाखल केल्या. या तिन्ही याचिका न्यायालयाने रद्द ठरवल्या. तरीही विभागाला त्रास देण्यासाठी त्यांनी गाडी नोंदणी शुल्कापोटी ३,००० डॉलरची नाणी भरली. नाणी मोजण्यासाठी सात तास लागले.  
 
-नाणी विभागाच्या कार्यालयापर्यंत नेण्यासाठी १,००० डॉलरमध्ये कचरा उचलण्याच्या गाड्या खरेदी केल्या.  
-नाण्यांचे वजन ७२६ किलो होते, ११ लोकांनी मिळून ही नाणी गोळा केली.