आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिकोचे चेबल रिसॉर्ट ‘बेस्ट डिझाइन हॉटेल’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युकेटन (मेक्सिको) - हे छायाचित्र येथील चेबल रिसॉर्टचे असून नुकताच याला जगातील बेस्ट डिझाइन हॉटेलचा पुरस्कार मिळाला आहे. युनेस्को आणि इंटरनॅशनल युनियन ऑफ आर्किटेक्टच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
 
मेक्सिकोचे आर्किटेक्ट जॉन बोर्जा आणि पाउलिना मोरान यांनी या हॉटेलची डिझाइन केली आहे. या हॉटेलमध्ये दोन प्रेसिडेन्शियल सूटसह ४० सूट आणि दोन व्हिला आहेत. ७५०  एकर परिसरात पसरलेले हे रिसॉर्ट माया संस्कृती आणि ऑपनेविशक स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना असल्याचे भासते. ‘स्पा’ला प्राचीन रूप देण्यात आले आहे. इन्फिनिटी पूल, मूव्हमेंट स्टुडिओ आणि प्लोटेशन रूम येथील मुक्कामाच्या अनुभवाला शानदार बनवतात. मेक्सिकोचे सर्वोत्कृष्ट शेफ आणि जगातील १२ बेस्ट शेफमध्ये समावेश असलेले जॉर्ज वॅलेजो बागेत उगवलेल्या ऑर्गेनिक उत्पादनांपासून बनवलेले पदार्थ सीझननुसार सर्व्ह करतात. येथे एका रात्रीचे भाडे ५७ ते ९५ हजार रुपये आहे.  
बातम्या आणखी आहेत...