आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकागो कॅफेच्या ‘इंटरनेट मुक्त’ पुढाकाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिकागो - जग दिवसेंदिवस तंत्रज्ञानाभिमुख होत आहे. त्यामुळे व्यक्तींचा आपसातील संवाद कमी होत चाललाय. कार्यालय, घर शिवाय कॅफेटेरियामध्येदेखील लोक लॅपटॉप, टॅब्लेट्स किंवा मोबाइलवर तासन््तास व्यग्र असतात. शिकागोच्या कॅफे किबित्जनेस्टमध्ये मात्र इंटरनेट वापरास बंदी आहे. या कॅफेच्या व्यवस्थापनाने इंटरनेटमुक्त राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येथे टेबलावर लॅपटॉप, टॅब्लेट दिसत नाहीत. लोक स्वत:मध्येच मश्गूल दिसत नाहीत.
 
परस्परांशी बोलतात. लहान मुले बोर्ड गेम खेळताना दिसतात. त्यासाठी वेगळी जागा बनवण्यात आली आहे. किबित्जनेस्टच्या इंटरनेटमुक्त संकल्पनेचे अनुकरण अनेक उपाहारगृहे करत आहेत.  
 
इंटरनेटमुक्तीचा विचार येण्याचे कारण काय ? याविषयी कॅफेची मालकीण अॅनी कॉस्तिनर यांनी सांगितले की आम्ही हे कॅफे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू केले. पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक जण एकटे आले. काही गटांनी आले होते. मात्र कॅफेमध्ये शांतता होती. कोणीही परस्परांशी बोलत नव्हते. सर्वजण मोबाइल किंवा लॅपटॉपमध्ये व्यग्र. लोकांनी शांत येऊन बसावे यासाठी आम्ही कॅफे सुरू केले नव्हते. मी याविषयी पती लेव्हिस यांच्याशी चर्चा केली. नंतर इंटरनेटमुक्त कॅफेची कल्पना आली. हा निर्णय व्यवसायाच्या दृष्टीने जोखमीचा होता. आजच्या काळात प्रत्येक मोठ्या कॉफी हाऊसमध्ये आणि हॉटेल्समध्ये विनामूल्य वायफायचे प्रस्थ आहे. लोक येथे भोजनासाठी येतात आणि कामही पूर्ण करून घेतात. त्यामुळे इंटरनेट सुविधा नसल्यावर ग्राहक येईल वा कसे हाच मुळात प्रश्न होता. मात्र नकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. लोकांना हा निर्णय आवडला. ते गप्पाटप्पांमध्ये आनंदाने वेळ घालवतात. आता शहरातील लोकप्रिय कॅफेटेरियांमध्ये याची गणना होते. किबित्जनेस्टमध्ये ग्राहकांना मोबाइल, लॅपटॉप जमा करून टाकावा लागतो. फिल मेरिक,जॉडी वॉलेनदेखील कॅफे चालवतात. वॉलेन सांगतात की त्यांनीदेखील वायफाय सुविधा बंद केली. सुरुवातीला ग्राहक कमी झाले. नंतर संख्या २० % वाढली.
 
अमेरिकन नागरिक दररोज १० तास देतात स्मार्टफोनसाठी  
भारतवंशीय राज चोपडा हे कॅफेचे नियमित ग्राहक आहेत. सुरुवातीला आपण येथे खाण्यापिण्यासाठी येत. संवाद तसा दुर्मिळच होता, असे राज सांगतात. मोबाइलवर गुंतून राहणाऱ्यांची संख्या अधिक होती. मात्र इंटरनेट फ्री झाल्यानंतर स्थिती बदलली. माझ्यासाठी आता हे कम्युनिटी सेंटरप्रमाणे आहे. आत येताच आम्ही मोबाइल जमा करतो. भरपूर गप्पा होतात. मुले खेळतात. एका संशोधनानुसार अमेरिकेत तरुण दररोज सरासरी १० तास मोबाइलवर घालवतात.  
 
बातम्या आणखी आहेत...