आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाड माता-पित्यांच्या मुलांचा विकास होतो उशिरा, अमेरिकेतील इयुनाईस केंडी शिरीव्हर नॅशनल इन्स्टिट्यूटचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- जाड असणे केवळ आपल्यासाठीच घातक नाही, तर आपल्या मुलांनाही घातक ठरते. अमेरिकेत एका संशोधनात हा निष्कर्ष काढला. जाड माता-पित्यांच्या मुलांचा विकास उशिराने होतो. त्यांना वैयक्तिक व सामाजिकदृष्ट्या येणारी समज उशिराने येते. विशेषत: ज्या महिला जाड आहेत त्यांच्या मुलांवर हा परिणाम अधिक दसून येतो. अशा महिलांच्या मुलांमध्ये कौशल्य गुण उशिरा विकसित होतात. 

अमेरिकेतील चाइल्ड हेल्थ अँड ह्यूमन डेव्हलपमेंटच्या इयूनाईस केंडी शिरीव्हर नॅशनल इन्स्टिट्यूटने हा दावा केला आहे. अभ्यासकांनी या संशोधनात ४८२१ मुलांवर संशोधन केले. यात चार महिन्यापासून तीन वर्षांपर्यंतची मुले होती. या सर्व मुलांची तुलना सडपातळ महिलांच्या मुलांशी केली गेली. यात असे आढळून आले की, जाड महिलांच्या मुलांमध्ये मांसपेशी, बोटे व हातांचा विकास उशिरा तर सडपातळ महिलांच्या मुलांमध्ये हाच विकास अत्यंत झपाट्याने झाला. जाड महिलांची मुले खेळांतही कमी असतात. अतिशय जाड असलेल्या माता-पित्यांची मुले एखादा प्रश्न सोडवण्याच्या कामीही कमी पडतात, असे संशोधनात नमूद आहे. 

वंध्यत्वावरील उपचार, स्थूलपणा आणि गरोदरपणातील समस्या जाणून घेणे हा या संशोधनाचा उद्देश होता.या संशोधनात प्रश्नावलीद्वारे मुलांची चाचणी घेतली. सहा वर्षांपर्यंतच्या मुलांचा शारीरिक विकास व त्यांचे व्यवहारिक ज्ञान यातून जाणून घेण्यात आले. शिवाय त्यांच्या मातांची जीवनशैली व आरोग्याविषयीच्या समस्याही जाणून घेण्यात आल्या. न्यूयॉर्कमधील ६ हजार मुलांवर हा प्रयोग करण्यात आला. संशोधन प्रमुख डॉ. इडविना येयुंग यांच्या मते, जाड पित्याच्या मुलांचा विकास विलंबाने होत असल्याचे आढळून आले. जाड माता-पित्यांच्या मुलांमधील हार्मोन्स आणि मेंदूही योग्य प्रमाणात विकसित होऊ शकत नाही. त्यांना हृदयरोग, मधुमेह आणि पक्षाघाताचा धोका असतो. 

भारतात ४० टक्के गरोदर महिला ओव्हरवेट
अमेरिकेत ५ पैकी १ गरोदर महिला जाड असते. त्यांचा बॉडी मास इंडेक्स ३० हून अधिक असतो. निरोगी माणसासाठी हा इंडेक्स १८.५ ते २४.९ असतो. याशिवाय २० ते ३० टक्के युवक स्थूल असतात. एका संशोधनानुसार भारतात २८ टक्के गरोदर महिला जाड, तर ११ टक्के अतिशय जाड असतात.
 
बातम्या आणखी आहेत...