आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे दोन अंतराळवीर ३० दिवसांसाठी अंतराळात; शेनझाई-११ चे यशस्वी प्रक्षेपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनने आपली आतापर्यंतच्या सर्वात दीर्घ मोहिमेअंतर्गत सोमवारी दोन अंतराळवीरांना अंतराळात पाठवले. चीनमध्ये अंतराळवीरांना तायकोनॉट असे संबोधले जाते. ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालणाऱ्या चिनी अंतराळ प्रयोगशाळेत ३० दिवस राहतील. तेथे पोहोचण्यासाठी त्यांना दोन दिवस लागतील. चीन २०२२ पर्यंत अंतराळात आपले एक मानवयुक्त स्थानक स्थापित करण्याचे काम करत आहे. त्यामुळे अंतराळात फक्त चीनचे मानवयुक्त स्थानक राहील. सध्याचे आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र २०२४ मध्ये निवृत्त होत आहे. आपल्या अंतराळयानातून मानवाला अंतरालात पाठवणारा चीन हा तिसरा देश आहे. याआधी रशिया आणि अमेरिका यांनी आपल्या यानाने मानवाला अंतराळात पाठवले आहे.
चीनच्या उत्तर पश्चिममेकडील गोबी वाळवंटातील जिउक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून शेनझाई-११ अंतराळयान रवाना झाले. भारतीय वेळेनुसार सकाळी पाच वाजता त्याचे यशस्वी प्रक्षेपण झाले. त्यात जिंग हाइपेंग आणि चेन डोंग हे दोन अंतराळवीर होते. हाइपेंग हे ५० वर्षांचे असून ते तिसऱ्यांदा अंतराळात गेले आहेत. याआधी ते २००९ आणि २००१ मध्ये अंतराळात गेले होते. ३७ वर्षीय चेन पहिल्यांदाच अंतराळात गेले आहेत.

चीनच्या मोहिमेवर दृष्टिक्षेप
{ १४,६७६ कोटी रुपये चीनच्या अंतराळ मोहिमेचा वार्षिक खर्च
{ २००३ मध्ये सुरू झाली मानवयुक्त मोहीम
{ २००२ पर्यंत अंतराळात स्थायी अंतराळ केंद्र उभारण्याचे लक्ष्य
मानवयुक्त केंद्र बनवण्याचे लक्ष्य
{ १८१ उपग्रह अंतराळात
{ ११ लोक गेले आहेत अंतराळात
{ रॉकेटचे नाव : लाँग मार्च २ एफ
{ शेनझोऊ-११ अंतराळयान सोमवारी रवाना झाले
{ थियानगाँग-२ अंतराळ प्रयोगशाळेत हे अंतराळवीर जाणार
{ अंतराळवीरांची नावे : जिम हायपेंग, चेन डोंग
बातम्या आणखी आहेत...