आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैवान, हाँगकाँगला स्वातंत्र्य मिळणारच नाही : केकियांग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी हाँगकाँग आणि तैवानला स्वातंत्र्य देण्याची मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनाची अंतिम फलनिष्पत्ती होणार नाही, असे त्यांनी रविवारी चीनच्या संसदेत स्पष्ट केले. चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये (संसदेत) देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नेत्याने हाँगकाँगचे स्वातंत्र्य अशा शब्दांचा प्रथमच उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, चीनमध्ये ‘एक देश-दोन व्यवस्था’ हे धोरण लागू राहील. चीनमध्ये राहून हाँगकाँगला १९९७ मध्ये दिलेल्या विशेष सुविधांचा संदर्भ केकियांग यांच्या या वक्तव्याला होता.  
 
पंतप्रधान केकियांग संसदेत म्हणाले की, माझे सरकार हाँगकाँग आणि मकाऊच्या सरकारला यापुढेही पाठिंबा देत राहील. त्या भागांचा विकास आणि तेथील नागरिकांच्या कल्याणासाठी आम्ही काम करत राहू. चीन आपले नौदल आणि हवाई दल आणखी मजबूत करेल. लष्कराचे आधुनिकीकरण सुरूच राहील, पण लष्कराचा अर्थसंकल्प किती असेल हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. चीनच्या संरक्षणविषयक अर्थसंकल्पात या वर्षी ७ टक्के वाढ होईल, असे एक दिवसापूर्वीच सरकारी प्रवक्त्याने म्हटले होते; पण रविवारी सादर झालेल्या तरतुदींत त्याचा काहीही उल्लेख नाही.
 
चीन कशामुळे नाराज
हाँगकाँगच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याच्या निवडणुकीत चीनच्या हस्तक्षेपाला हाँगकाँगमधील युवक विरोध करत आहेत. युवकांना आता चीनपासून स्वातंत्र्य हवे आहे. दुसरीकडे तैवानच्या राष्ट्राध्यक्षा साई इंग-वेन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याने चीन नाराज आहे. मकाऊही हाँगकाँगजवळील छोटे बेट असून त्यावर चीनचे नियंत्रण आहे.
बातम्या आणखी आहेत...