आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'आम्हाला युद्ध नकोय..\' PAK च्या NSA ने केली होती डोभाल यांना विनंती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जंजुआ यांनी डोभाल यांना म्हटले होते, सीमेवर तणाव वाढता कामा नये. - Divya Marathi
जंजुआ यांनी डोभाल यांना म्हटले होते, सीमेवर तणाव वाढता कामा नये.
इस्लामाबाद - सर्जिकल स्ट्राइकनंतर एनएसए अजित डोभाल आणि पाकिस्तानचे एनएसए नसीर खान जंजुआ यांच्या चर्चा झाली होती. पाकिस्तानी वृत्तपत्र 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'ने रिपोर्टमध्ये हा दावा केला आहे. रिपोर्टनुसार, जंजुआ यांनी डोभाल यांना सीमेवर तणाव वाढता कामा नये. पाकिस्तानला युद्ध नको आहे, कारण त्यामुळे केवळ नुकसानच होईल. त्यामुळे पाकिस्तानकडून युद्धासंबंधी वक्तव्ये होणार नाहीत, याचा प्रयत्न केला जाईल असे ते म्हणाले होते.

काय ठरले चर्चेत..
- उरी हल्ल्यानंतर भारताने पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यात 38 दहशतवादी आणि पाकिस्तानचे दोन सैनिक मारले गेले होते. त्यानंतर एलओसीवर तणाव वाढू लागला. दोन्ही बाजुची गावे रिकामी करण्यात आली. युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती.
- वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार त्यानंतरच 2 ऑक्टोबरच्या रात्री जंजुआ-डोभाल यांच्यात चर्चा झाली होती.
- युद्ध हा पर्याय नाही. त्यामुळे तणाव कमी व्हायला हवा या मुद्यावर जंजुआ आणि डोभाल यांचे एकमत झाले होते.
- रिपोर्टनुसार, जंजुआ डोभाल यांना म्हणाले होते की, तणाव कमी करायचा असेल तर आधी चिथावणीखोर वक्तव्ये थांबवायला हवी. कारण युद्ध झाले तर दोन्ही देशांचे केवळ नुकसानच होईल. त्यामुळे अशी वक्तव्ये थांबवण्याची विनंती त्यांनी डोभाल यांना केली होती.

काय म्हणाले डोभाल...
- रिपोर्टनुसार भारताचे एनएसए डोभाल यांनीही मोदी सरकारलाही तणाव नको आहे असे जंजुआ यांना सांगितले. इंडियन ऑफिशियल्सकडून तणाव वाढवणारी वक्तव्येही निर्माण केली जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
- वृत्तपत्रानुसार, त्यानंतरच मोदी मंत्र्यांना म्हणाले की, सर्जिकल स्ट्राइकबाबत ज्यांचा यांच्याशी संबंध आहे, त्यांनीच याबाबत वक्तव्य करावे.
- भारतात पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनीही तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कन्फर्म केले आहे. भारतीय अधिाकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचेही ते म्हणाले.
- पुढच्या वर्षी भारतात काही राज्यांत निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी भारत चर्चेला तयार होणार नाहीत, असेही बासीत म्हणाले. पाकिस्तानबाबत मोदींच्या धोरणसाठी देशांतर्गत परिस्थिती कारणीभूत असल्याचेही ते म्हणाले.

डीजीएमओंचीही चर्चा
- रिपोर्टनुसार दोन्ही देशांचे डीजीएमओदेखिल परिस्थिती सुधारण्यासाठी झटत आहेत. पाक लष्कराचे प्रवक्ते, असीम बाजवा चीनची न्यूज एजन्सी शिन्हुआशी बोलताना म्हणाले की, दोन्ही देशांनी एलओसीवर तणाव कमी करण्यासाठी मिलिट्री चॅनल्स मोकळे केले आहेत.
- दुसरीकडे, नवाज शरीफ यांचे परराष्ट्र विषयांचे सल्लागार सरताज अजिज म्हणाले की, जोपर्यंत मोदी पंतप्रधान आहेत, तोपर्यंत दोन्ही देशांतील नात्यातील दुरावा कमी होणार नाही.
बातम्या आणखी आहेत...