आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहस...1,200 फूट उंच इमारतीवर 100 टन वजनी टॉवर लावणारे पाच जिगरबाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिसमधील १,१०० फूट उंचीच्या विल्शायर ग्रँड सेंटर इमारतीवरून हे छायाचित्र टिपलेले आहे. यात दिसणारे एरिक, पीटर, विन्स, डेन आणि मार्क हे पाच तरुण उंच क्रेनच्या मदतीने शेकडो फूट उंचीवर काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. येथीलच गॅरी लियोनार्ड यांनी ड्रोनद्वारे हे छायाचित्र टिपले आहे. 
 
या टॉवरचे वजन १०० टन किलो असून उंची २९४ फूट एवढी आहे. इमारतीवर टॉवर उभे करण्यासाठी अभियंत्यांची एक मोठी टीम खाली उभी होती. गॅरी म्हणतात, हे छायाचित्र टिपणे खूप कठीण होते. मात्र या पाचही तरुणांनी मोठे धाडस दाखवत मला प्रोत्साहन दिले आणि आम्ही छायाचित्र काढण्यात यशस्वी झालो. इंटरनेटवर छायाचित्राला खूप लोकप्रियता मिळत आहे.
- reddit.com
बातम्या आणखी आहेत...