आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज नवी दालने सुरू करणारी कंपनी ; वडिलांच्या कंपनीचा विस्तार युरोप,अमेरिका ,आशियात केला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टीफन पर्सन स्वीडनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ग्लोबल फॅशन रिटेलर एच अँड एम (हेन्स अँड मॉरिट्ज) मध्ये त्यांची २८% भागीदारी आहे. ते कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे वडील इर्लिंग पर्सन यांनी १९४७ मध्ये कंपनीची स्थापना केली. दरवर्षी १० % वाढीचे उद्दिष्ट सध्या कंपनीने ठेवले आहे. त्यासाठी दररोज एक दालन सुरू करणे आवश्यक आहे. कंपनी अनेक नव्या देशांमध्ये आपली दालने सुरू करत आहे. यात भारत आणि दक्षिण आफ्रिकाही आहेत. चीनमध्ये कंपनीने सर्वाधिक दालने सुरू केली आहेत. एच अँड एम शिवाय त्यांच्या युरोप आणि अमेरिकेत अनेक रिअल इस्टेट मालमत्ता आहेत. रिअल इस्टेट बिझनेस राम्सबरी प्रॉपर्टी नावाने सुरू करण्यात आला. न्यूयॉर्कच्या फिफ्थ अॅव्हेन्यू, लंडनच्या ऑक्सफर्ड स्ट्रीट, रोमच्या वाया डेल कॉर्सो येथेही त्यांच्या मालमत्ता आहेत.  
 
१९४० मध्ये कंपनीने पहिले दालन सुरू केले तेव्हा ते केवळ महिलांच्या वस्त्रांसाठी होते. याला यश आल्यानंतर दुसरे दालन स्टॉकहाेम येथे सुरू करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर वस्तूंचे भाव कमी होते. कंपनीची स्वस्त आणि वाजवी दरातील उत्पादने लोकप्रिय ठरली. त्या वेळी कंपनीचे नाव हेन्स होते. याचा अर्थ ‘ तिच्यासाठी ’ असा होतो. १९६५ मध्ये मॉरिट््ज विडफ्रॉसचे अधिग्रहण करण्यात आले. त्याचे नाव जुन्या नावाशी जोडण्यात आले. ही पुरुषांच्या वस्त्रांची श्रेणी होती.  
 
१९७४ मध्ये कंपनी स्टॉकहोम स्टॉक एक्स्चेंजमध्ये सामील झाली तेव्हा स्टीफन महाविद्यालयात होते. १९७६ मध्ये पदवी शिक्षणानंतर त्यांनी कुटुंबाच्या उद्योगाची सूत्रे हाती घेतली तेव्हा कंपनी स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्कमध्ये होती. १९८२ मध्ये कंपनीचे सीईआे पद स्टीफनकडे आले. १९९८ मध्ये अध्यक्ष झाले. कंपनीचा विस्तार त्यांनी युरोप आणि अमेरिकेत केला.  १९९० मध्ये कंपनीची उत्पादने लहान मुलांसाठीही उपलब्ध झाली. यानंतर कंपनी युरोपातील सर्वात मोठी अॅपेरल रिटेलर ठरली. कंपनीच्या ध्येयधोरणांविषयी २००२ मध्ये स्टीफन यांनी म्हटले होते की, फॅशनला अल्पजीवी उत्पादने म्हणूनच पाहिले पाहिजे. याला नेहमी अद्ययावत आणि परिवर्तनशील ठेवणे गरजेचे आहे. ट्रेंड रुजण्यापूर्वीच आेळखता आला पाहिजे. याला वाजवी दरात विकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दालनातील रॅक चटकन रिकामे होतात. कंपनीच्या यशामागे आणखी एक मोठे कारण आहे. इन हाऊस डिझायनर टीम. स्टीफन यांनी नव्या पदवीधरांना संधी दिली. कंपनीची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीच त्यांनी असा चमू तयार केला. आज कंपनीच्या उत्पादनांमध्ये कपडे, अॅक्सेसरीज, पादत्राणे, कॉस्मेटिक्स, होम टेक्स्टाइल यांचा समावेश होतो. सोबतच कॉस्मेटिक्स, स्पोर्ट्स विअर आहेत. कंपनीच्या ब्रँडमध्ये सीआेएस, वीकडे, चीप मंडे, मॉनकी आदींचा समावेश आहे. १ लाख ६१ हजार कर्मचारी आज कंपनीत कार्यरत आहेत. ४३९३ दालने जगभरातील ६५ देशांत आहेत. कमी नफा, चांगला दर्जा, वेगाने परिवर्तन या त्रिसूत्रीवर त्यांच्या कंपनीचा डोलारा उभा आहे. एका छोट्या कंपनीच्या रूपात ही कंपनी काम करते हे याचे वैशिष्ट्य आहे. कंपनीचे संस्थापक इर्लिंग पर्सन यांची इच्छा होती की कंपनीची मानसिकता नेहमी छोट्या कंपनीप्रमाणे राहिली पाहिजे. येथे आेपन डोअर पॉलिसीप्रमाणेच काम केले जाते.

- स्वीडनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती स्टीफन पर्सन यांनी ४० वर्षांपूर्वी कंपनीची सूत्रे स्वीकारली  
- कंपनीची ४३९३ दालने जगातील ६५ देशांत आहेत  
 
बातम्या आणखी आहेत...