आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या मृत्यूने कोसळलेल्या सुपरवुमनची कथा; आता ती इतरांना दाखवते दु:खातून सावरण्याचा मार्ग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेव गोल्डबर्ग यांच्यासाठी १ मे २०१५ हा चांगला दिवस होता ज्याचा त्रासदायक अंत झाला. सर्वेमंकी कंपनीचे सीईओ आपल्या जवळच्या लोकांसमवेत सिलीकॉन व्हॅलीतील सर्वाच्या पसंतीच्या  मेक्सिकन रिसॉर्ट पुंटा मिटामध्ये आपले जीवलग मित्र फिल ड्यूच यांचा ५० वा वाढदिवस साजरा करत होते. स्वीमिंग पुलानजीक आपल्या सहकाऱ्यांसमवेत ते खेळत होते. त्यांची कंपनी चांगली चालत होती. मुले व त्यांची पत्नी चांगली होती. त्यांचे फेसबुकच्या सीईओ शेरील सँडबर्गसमवेत जीवन आनंदाने चालले होते. पण अचानक त्यांची हृदयक्रिया  बंद पडली. मित्रांमध्ये गोल्डी नावाने प्रसिद्ध असलेले ४७ वर्षांचे गोल्डबर्ग थंड पडलेले आहेत, असे त्यांचे छोटे बंधू रॉब आणि शेरिल सँडबर्ग यांच्या लक्षात आले. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यावेळी रुग्णालयात शेरील ज्या पद्धतीने रडत हाेत्या, त्यांना तसे रडताना मी कधीच पाहिले नव्हते, असे फिल म्हणाला. 

मृत्यू हे असे एक भविष्य आहे, जे जन्म घेताक्षणीच आपण वर्तवू शकतो आणि त्यावर विश्वासही ठेवू शकतो. प्रत्येकाचा मृत्यू हाेणार आणि आपण ज्यांच्यावर  प्रेम करत असतो, त्यांचाही मृत्यू आपणासमोर होणार काय? अशीही शंका आपल्याला नेहमीच भेडसावत असते. पण दु:खात बुडालेल्या लोकांशी इतर असे वागतात की, त्यांच्यासमवेत काही अनैसर्गिक आणि अशोभनीय असे काही तरी झालेले आहे. अनेक लाेक अशा शोकग्रस्त लोकांपासून दूर राहतात. त्यांना कुठे बोलावले जात नाही. ते खोलीत आल्यास इतर लोक शांत होतात. ज्यावेळी समाजाची अशा शोकग्रस्त लोकांना गरज असते, नेमके त्याच वेळी त्यांना दूर ठेवले जाते.   

४७ वर्षीय शेरील सँडबर्ग यांनी ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोकांना मृत्यूच्या भयावह वातावरणातून जीवनाच्या मूळ प्रवाहात आणण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यांचे नवे  पुस्तक-ऑप्शन बी : फेसिंग एडवर्सिटी, बिल्डिंग रिजिलिएन्स अँड फायंडिंग जॉय, दु:खी लोकांना नव्या दमाने उभे राहण्यासाठी आणि जीवनाचा आनंद मिळवून देण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकेल. सँडबर्ग यांनी आपले मित्र आणि मनोवैज्ञानिक अॅडम ग्रांटसमवेत हे पुस्तक लिहिले आहे. त्यांचे पहिले पुस्तक-लीन इनप्रमाणेच ऑप्शन बीचे प्रकाशन शेरील सँडबर्ग, डेव गोल्डबर्ग फॅमिली फाउंडेशनने केले आहे. 

सँडबर्गचे प्रतिनिधी असा दावा करतात की, हे फाउंडेशन कठीण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू इच्छिते. पण इतका अवघड पाठ शिकवण्यासाठी सँडबर्ग हे चुकीचे शिक्षक आहेत. बाहेरून तरी त्यांचे जीवन सुखी आणि संपन्न वाटते. ते अब्जाधीश आहेत. त्यांच्या नेटवर्कमुळे त्यांचा संपर्क प्रत्येकाशीच राहतो. शेरील यांना आपली स्थिती किती मजबूत आहे ते जाणतात. पण या मागे मानवी कमजोरीही आहे. पतीच्या मृत्यूनंतर अंदाजे एका महिन्यात लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये यांची झलक मिळते. पुस्तक किंवा फेसबुकमध्ये जो सल्ला दिला गेला आहे त्यात नवे असे काही नाही. 

दु:ख ही काही अभिनव समस्या नाही. पण सँडबर्गसारखा दृष्टिकोन ठेवणाऱ्या फार कमी लोकांनी माेहीम सुरू करण्याच्या उद्देशाने या दु:खासंदर्भात चर्चा केली असेल. सँडबर्ग यांच्या २०१५ मधील पोस्टवर ७५ हजार प्रतिक्रिया आलेल्या आहेत. प्रतिक्रिया देणारांमध्ये फेसबुकचे कर्मचारीही सहभागी आहेत, ज्यांना हे माहीत नाही की, मीटिंगमध्ये रडणाऱ्या आपल्या प्रसिद्ध बॉससमोर कोणती समस्या आहे ते. सँडबर्ग लिहितात की, सिलिकॉन व्हॅलीमध्ये असे होत नाही. फेसबुकचे सीईओ मार्क जुकेरबर्ग म्हणतात की, अनेकांना शेरीलशी संपर्क करायचा आहे. पण तो कसा करायचा हे त्यांना माहीत नाही. तुम्ही जुन्या खपल्या काढत आहात काय? हाच प्रश्न अनेकांना विचारायचा आहे.  

सँडबर्ग म्हणतात की, त्यांनी भावनाप्रधान होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  व्हार्टन स्कूलच्या प्रोफेसर अॅडम ग्रांट यांचे म्हणणे आहे की, लोकांना मदतीबरोबरच त्यांनी नेतृत्वही चांगल्यापैकी केले आहे. शेरील यांनी हे दु:ख कशाप्रकारे झेलले हे लोकांनी जाणून घेतले पाहिजे. दु:खाच्या वेळी भावना व्यक्त करणे म्हणजे कमजोरी नाही. गोल्डबर्ग यांच्या मृत्यूनंतर आपल्या व्यथा एका वृत्तपत्रात मांडत होत्या. आपल्या जवळच्या लोकांसमवेत त्यांनी आपले दु:ख शेअरही केले. त्या म्हणतात की, मी अशा प्रकारे लिहीतच गेले. त्यांनी एक लाखापेक्षा आधिक शब्द लिहिले, यातूनच त्या दु:खातून सावरल्या. हेच शब्द त्यांच्या पुस्तकाचा मुख्य भाग बनले.

सँडबर्ग म्हणतात की, गोल्डबर्ग यांच्या मृत्यूनंतर जेव्हा मी पहिल्या दिवशी ऑफिसला गेले तेव्हा एका मीटिंगमध्ये चक्क झोपलेच आणि एका सहकाऱ्याला ओळखलेच नाही. मी दुपारी दोन वाजता मुलांना घेण्यासाठी शाळेत गेले. त्या दिवशी सायंकाळी जुकेरबर्ग म्हणाले की, तुम्हाला पाहिजे तितके दिवस सुटी घ्या. तुमच्या ऑफिसमध्ये येण्याने मला प्रसन्न वाटले. एक अन्य मित्र चमथ पालीहेपिटिया यांनी सँडबर्ग यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षेची आठवण करून दिली. हळूहळू सँडबर्ग दु:खाच्या वातावरणातून बाहेर आल्या.त्यांनी एका पार्टीत नृत्यही केले. तीस वर्षांनंतर पियानो वाजवण्यास सुरुवात केली. नातेवाइकांनी प्रोत्साहन दिल्यानंतर त्यांनी डेटिंगही सुरू केले.  गेमिंग कंपनी एक्टिविजन ब्लिजार्डचे मालक बॉबी कोटिक हे त्यांचे सध्याचे प्रेमिक आहेत. सँडबर्ग यांनी आपला वाढदिवस साजरा करणे सुरू केले. या अगोदर पाच वर्षांतून एकदा त्या आपला वाढदिवस साजरा करत असत.   

शेरील सँडबर्गने काही अडचणींना तोंड दिले व आपले जीवन आनंददायी बनवले. पण त्या आपल्या मुलांना त्यांचे निवर्तलेले वडील थोडेच आणून देऊ शकणार आहेत? त्या जेव्हा याबाबत मीटिंग रूममध्ये बोलत असतात, तेव्हा त्यांना रडू कोसळते आणि त्यावेळी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून चालू असणारे पडदे त्या आपल्याभोवती ओढून घेतात, जेणेकरून आपले दु:ख कोणला   दिसू नये. ऑप्शन बीमध्ये त्या लिहितात की, यापेक्षा मोठे दु:ख कोणतेच असू शकत नाही. 

जेव्हा मी भविष्यकाळाचा विचार करते तेव्हा माझा गळा दु:खाने भरून येतो. सुखसंपन्नता असूनही एकटी आई म्हणून जगण्याचे दु:ख पाहून सँडबर्ग यांना मोठा आघात झेलावा लागला होता. म्हणूनच मी सार्वजनिक धोरणांबाबत खुल्या दिलाने बोलू शकते. फादर्स डेला त्या आणि त्यांची मुले अनाथ मुलांच्या कँपसना भेटी देतात. त्यांनी एप्रिल महिन्यात महिला आणि पुरुषांच्या वेतन असमानतेबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. मॅटर्निटी आणि पॅटर्निटी लिव्हमध्ये बदल करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणतात. 

एक सुपरवुमनच्या मानवी भावना
पतीच्या मृत्यूनंतर एक महिन्याने म्हणजे जून, २०१५ मध्ये शेरीलने फेसबुकवर पोस्ट लिहिली. त्या लिहितात की, ‘संकटे तुम्हाला एक पर्याय देतात. एकटेपणामुळे जीवन असह्य होऊ शकते. मन आणि डोके रिकामे राहते. तुमच्या विचारांवर मर्यादा येतात किंवा त्याची उत्तरे शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करता.   गेल्या तीस दिवसांत माझा बहुतेक वेळ रिकामाच गेला. अचानक एक सुपर वुमन समान्य मनुष्य बनते. सँडबर्ग यांनी स्वजनांच्या विरहाने व्यथित लोकांशी वागण्याच्या दिलेल्या टिप्स
- दु:खी आणि  व्यथित लोकांकडे दुर्लक्ष करू नका. पण त्यांची इच्छा असल्यास त्यांना एकटे सोडा. 
- सर्व काही ठीक होईल असे त्यांना सांगू नका. कारण हे तुम्हाला कसे माहिती? 
- शोकग्रस्त व्यक्तीला हे विचारू नका की, तुम्ही कसे आहात? याऐवजी त्या दिवशी काय करत होता, असे तुम्ही विचारू शकता.

तीन काल्पनिक धारणा
सँडबर्ग यांनी ग्रांट यांच्या सहाय्याने हे जाणले की, लोकांच्या मनात तीन कल्पना असतात. यामुळे अडचणीतून ते वर येत नाहीत. 
- पहिली गोष्ट ही की, जे काही झाले, त्याबद्दल हेच दोषी अाहेत.
- दुसरी गाेष्ट ही की, त्यांच्या पूर्ण जीवनात दु:खाची छाया असावी. 
- तिसरे म्हणजे ते कायम असेच दु:खी राहणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...