आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुमेहींमध्ये कर्करोगाने मृत्यूचा धोका वाढला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - आशियात मधुमेह टाइप-२ च्या रुग्णांचा धोका वाढला आहे. मधुमेहामुळे कर्करोग होऊन मृत्यू होण्याचा धोका वाढला आहे. भारत, बांगलादेशसह इतर १९ देशांत हे धोका आढळून आला आहे, असा इशारा अमेरिकेतील संशोधकांनी दिला आहे.  
 
मधुमेहातून कर्करोगाची शक्यता २६ टक्क्यांनी बळावली आहे. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या संशोधकांनी यासंबंधीचा अभ्यास केला आहे. मधुमेहाचे परिणाम तपासण्यासाठी संशोधकांनी भारत, बांगलादेश, दक्षिण कोरिया, तैवान, सिंगापूर, जपान इत्यादी १९ देशांतील रुग्णांचा सखोल अभ्यास केला. विकसनशील देशातील व युरोपातील  टाइप-२ मधुमेहींचा त्यात समावेश होता. सरासरी ५३.९ वर्षे वयाच्या रुग्णांचा अभ्यासात समावेश करण्यात आला होता. त्यांचा १२.७ वर्षे अभ्यास करण्यात आला.  
 
कोणत्याही प्रकारचा कर्करोग  
टाइप-२ मधुमेह झालेल्या रुग्णांमध्ये मद्यपान, धूम्रपान किंवा बीएमआयसंबंधी समस्येमुळे कोणत्याही प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता २६ टक्क्यांनी बळावते. त्यातून त्यांच्यावर मृत्यू आेढवू शकतो, असे अभ्यासाच्या निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे. यकृत, थायरॉइड, मूत्रपिंडाचा कर्करोग झाल्याचे सविस्तर संशोधनातून आढळून आले आहे.  
 
टाइप-२ घातक  : अातापर्यंत विविध प्रकारच्या संशोधनांत टाइप-२ मधुमेह आशियातील लोकांसाठी घातक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे टाइप-२ बाबत सतर्क राहिले पाहिजे, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. त्यातही आशियातील लोकांसाठी यकृताच्या कर्करोगाचा धोका अधिक असल्याचा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे, असे अभ्यास प्रकल्पाचे प्रमुख यू चेन यांनी म्हटले आहे.  
 
बारा वर्षांत ३७ हजार मृत्यू  
आशियातील विविध देशांत मधुमेहींमध्ये कर्करोग उद्भवल्याची अनेक उदाहरणे समोर आली असून १२ वर्षांच्या अभ्यास काळात सुमारे ३७ हजार ३४३ रुग्णांचा कोणत्या ना कोणत्या कर्कराेगामुळे मृत्यू झाला, असा दावा संशोधकांनी केला आहे.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...