आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्वाटेमालात सरकारी वसतिगृहाला आग लागून 22 मुलींचा मृत्यू, राष्ट्रीय दुखवटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेणबत्त्या पेटवून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. - Divya Marathi
मेणबत्त्या पेटवून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सॅन जोश पिन्यूला - येथे मुलींच्या सरकारी वसतिगृहाला लागलेल्या आगीमध्ये २२ जणींचा मृत्यू झाला. या वसतिगृहात क्षमतेपेक्षा अधिक तरुणी राहत असल्याने आग लागल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराकडे जाताना एकच गोंधळ उडाला. लॅटीन अमेरिकन देश ग्वाटेमाला येथे ही घटना मंगळवारी सायंकाळी  घडली. ग्वाटेमालाच्या राजधानीजवळ हे वसतिगृह आहे.
 
वसतिगृहात ज्या ठिकाणी मुली राहतात तिथे आग भडकली. येथील गाद्यांना आधी आग लागली होती.  वसतिगृहाच्या दोन्ही भागात पाहता पाहता आग पसरली. यात २२ किशोरवयीन मुली ठार झाल्या. तर चेंगराचेंगरीत अनेक जणी जखमी झाल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. भाजलेल्या मुलींची  स्थिती गंभीर अाहे.
 
राष्ट्राध्यक्ष जिमी मोरालेस यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या वसतीगृहात १३ ते १७ वर्षे वयोगटातील मुली आहेत. या घटनेनंतर ३ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. पालक आपल्या पाल्यांविषयी जाणून घेण्यास आतुर असून मृतांची नावे अद्याप जाहीर करता आलेली नाहीत. पालकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. दोन स्थानिक रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.  
 
बळींच्या डीएनए चाचणीनंतरच त्यांची नावे जाहीर करणे शक्य असल्याचे वसतिगृह प्रशासनाने म्हटले आहे. येथील रुझवेल्ट रुग्णालयाने पालकांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. जखमींच्या दातांची तपासणी किंवा शरीरावरील एखादे गोंदण पाहूनच त्वरित आेळख पटवली जाऊ शकेल असे डॉ. मार्को अँटिनिआे बार्रींटोस यांनी सांगितले. रुग्णवाहिकांमधून अनेक जळालेले देह उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्वरित आेळख पटवणे अशक्य असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.आग लागल्याच्या आदल्या दिवशीच या वसतीगृहात लैंगिक शोषण होते या कारणास्तव निदर्शने झाली होती.
बातम्या आणखी आहेत...