आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयात दर 11 मिनिटांनी विचलित होते लक्ष, पुन्हा फोकस करण्यास लागतात 23 मिनिटे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्को - कामाच्या ठिकाणी लक्ष विचलित होण्याच्या समस्येतून मार्ग काढणे शक्य होणार आहे. कामावर पुन्हा फोकस वाढवण्यासाठी हेडफोनची मदत मिळणार आहे. याचा कुणीही सहज वापर करू शकेल. काम करताना लक्ष विचलित होताच हा हेडफोन तुम्हाला सतर्क करेल. यासोबत कितीही गोंगाटा असला तरी हेडफोन शांत वातावरण तयार करेल.  

सॅन फ्रान्सिस्कोतील तीन अभियंत्यांनी तो तयार केला. त्यास “माइंडसेट’ नाव दिले. संशोधनाबद्दल अभियंते म्हणाले, जानेवारी २०१६ मध्ये याची कल्पना सुचली. कार्यालयात गोंगाटात काम करता येत नाही यावर मित्रांसोबत चर्चा सुरू होती. आमच्या अभ्यासात कामाच्या ठिकाणी सरासरी दर ११ मिनिटांनी लक्ष विचलित होत असल्याचे दिसले. पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी २३ मिनिटे लागतात. कामातील जवळपास २८ % वेळ वाया जातो. याच हिशेबाने संपूर्ण करिअरदरम्यान जवळपास २० हजार तास कामाविना घालवले जातात. याचा थेट परिणाम उत्पादकतेवरही होतो. अभ्यासाअंती आम्ही मार्च २०१६ मध्ये हेडफोनवर काम सुरू केले आणि तो आकाराला येण्यास एक वर्ष लागले. येत्या सप्टेंबरपासून उत्पादन सुरू होणार आहे. माइंडसेटमध्ये पाच सेन्सर्स लावले असून ते मेंदूच्या इलेक्ट्रो एन्सेफेलोग्राफी सिग्नल्स ट्रॅक करेल. न्यूरो-फीडबॅक तंत्रज्ञानावर ते काम करते. हेडसेट घातल्यानंतर तुमच्या मेंदूची कार्यपद्धती ट्रॅक करेल. लक्ष विचलित होताच हे उपकरण अलर्ट करेल. यामुळे एकाग्रताही वाढेल. माइंडसेटमधील ८०० एमएएचची बॅटरी एकदा चार्ज झाल्यावर ८ तास चालेल. आतापर्यंत अनेकदा चाचण्या झाल्या. त्रुटी दूर करून अंतिम उपकरण तयार केले आहे.  डिसेंबर २०१७ पासून हेडसेटचा पुरवठा सुरू झाल्यानंतर तो जगभरात कुठेही मिळेल. त्याची किंमत २३ हजार रुपये असेल.
 
नासाच्या अंतराळवीरांचे प्रशिक्षण, ऑलिम्पिक स्केटर्सची सर्जनशीलता वाढीसाठी उपयुक्त तंत्रज्ञानावर हेडफोनची निर्मिती  
माइंडसेट बनवणाऱ्या टीमने सांगितले, हेडफोनमध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाची वैद्यकीय चाचणी घेतली. साधारण ५० वर्षांपासून रुग्णालयांत ब्रेन इमेजिंग, रोगनिदानात याचा वापर होतो. नासाच्या अंतराळवीरांचे प्रशिक्षण, ऑलिम्पिक फिगर स्केटर्सची सर्जनशीलता वाढवणे, अटेन्शन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डरच्या उपचारातही या तंत्राचा उपयोग होतो. 
बातम्या आणखी आहेत...