आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूल हादरले : डॉक्टरी वेशातील अतिरेक्यांचा लष्करी रुग्णालयावर हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील सरदार मुहम्मद दाऊद खान या सर्वात मोठ्या लष्करी रुग्णालयात बुधवारी डॉक्टरांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात ३० पेक्षा जास्त जण ठार तर ६० पेक्षा जास्त जखमी झाले. दहशतवादी आणि पोलिस यांच्यातील चकमक सुमारे सहा तास चालली. ४०० खाटांच्या या रुग्णालयाच्या वरच्या भागात एका दहशतवाद्याने स्वत:ला स्फोट करून उडवले. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. तालिबान अफगाणिस्तानने एक पत्रक जारी करून, या हल्ल्यात आपला हात नसल्याचे म्हटले आहे.

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता जनरल दौलत वजिरी यांनी सांगितले की, एक स्फोट आणि काही वेळ झालेल्या गोळीबारानंतर अनेक बंदूकधारी सरदार मुहम्मद दाऊद खान रुग्णालयात घुसले. ते डॉक्टरांच्या वेशात होते. ४०० खाटांचे हे लष्करी रुग्णालय दोन नागरी रुग्णालयांदरम्यान आहे. ते वजीर अकबर खान रस्त्यावर असून, तेथे अमेरिकेसह अनेक देशांचे दूतावास आहेत. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, तीन ते पाच हल्लेखोर स्वयंचलित शस्त्रास्त्रे आणि हातबॉम्बसह रुग्णालयात घुसले होते. वजिरी यांनी सांगितले की, अफगाणिस्तानच्या सैनिकांनी एकेका मजल्यावर जाऊन हल्लेखोरांशी मुकाबला केला. रुगण्यालयाच्या सहाव्या आणि आठव्या मजल्यावरून हल्लेखोरांना हाकलण्यात आले. एका हल्लेखोराने कमरेला बांधलेल्य स्फोटकांनी स्वत:ला उडवले, दुसऱ्याला सैनिकांनी ठार मारले. तीन हल्लेखोर जखमी आहेत. रुग्णालयावर हल्ला झाल्यानंतर दोन तासांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी सोशल मीडियावर मेसेज पोस्ट केले. ‘हल्लेखोर रुग्णालयात आहेत, आमच्यासाठी प्रार्थना करा,’ अशी पोस्ट एकाने फेसबुकवर टाकली होती.  
 
हल्लेखोरांना माफी नाही
- ‘हा मोठा गुन्हा आहे. रुग्णालयांवरील हल्ल्याचे कुठल्याही स्थितीत समर्थन करता येऊ शकत नाही. आम्ही या गुन्हेगारांना कधीही माफ करणार नाही. दुर्दैवाने या हल्ल्यात काही जणांचा बळी गेला आहे. हल्लेखोर डॉक्टरच्या वेशात मागच्या प्रवेशद्वाराने आले होते.
- अब्दुल्ला अब्दुल्ला, अफगाणिस्तानचे प्रमुख प्रशासक
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...