आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेनमध्ये पतींपासून सुरक्षेसाठी महिलांकडून स्पेशल डॉगची खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद(स्पेन) - स्पेनमधील स्त्रियांनी पतीच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा म्हणून अनोखा मार्ग अवलंबला आहे. या महिला सुरक्षा संस्थांकडून श्वानांची खरेदी करत आहेत. पतीने शिवी दिल्यास, मारहाण केल्यास हा श्वान पतीवर धावून जातो. विशेष म्हणजे हा श्वान अशा वेळी केवळ संबंधित महिलेच्या पतीलाच लक्ष्य करतो. पतींना कशा पद्धतीने भीती दाखवावी याचे प्रशिक्षण सुरक्षा संस्था या श्वानांना देत आहेत. या श्वानाची चांगली ओळख व्हावी यासाठी खरेदी केलेल्या श्वानासोबत महिलेस २०० तासांचे प्रशिक्षण दिले जाते.

गेल्या काही वर्षांत स्पेनमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी १३% स्पॅनिश महिला आपला जोडीदार आणि विभक्त जोडीदाराच्या लैंगिक तसेच शारीरिक हिंसाचाराला बळी पडल्या आहेत. यामध्ये शिवीगाळ व मारहाणीची सर्वांत जास्त प्रकरणे आहेत. यामुळे घटस्फोटांचे प्रमाणही वाढले आहे.
घटस्फोट घेतल्यानंतरही विभक्त पती पत्नीच्या घरी जाऊन मारहाण करतो. या महिलेस तत्काळ सुरक्षा देणे पोलिसांनाही आव्हान ठरते. मात्र, सध्या बहुतांश महिला यावर उपाय शोधत श्वानाची खरेदी करत आहेत. हा श्वान खरेदी करणारी अमेरिकी महिला म्हणाली, कौटुंबिक हिंसाचाराबाबत मी अनेक ग्रुप थेरपी सेमिनार केले. मात्र, मला मदत मिळाली नाही. त्यामुळे श्वान खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
दहा महिलांमध्ये बसून स्वत:वर ओढवलेले प्रसंग सांगणे व त्यांचे गाऱ्हाणे ऐकणे आवडत नव्हते. कधी, केव्हा व कशी घटना झाली हे सांगण्यातून दु:ख हलके होत नाही. आता श्वानच मला चांगली मदत करतोय. पती माझ्याशी भांडत नाही. महिलांना प्रत्येक ठिकाणी श्वानांना नेण्यास परवानगी मिळावी. गिमा म्हणाली, मी श्वान घेऊन कार्यालयात जाते. निघताना गेटवर तो माझी वाट पाहतो. त्याच्यासोबत मला सुरक्षित वाटते. पती तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माझ्याकडे श्वान आहे असे कळल्यावर तो दुसऱ्या पत्नीच्या शोधात आहे.
२५ वर्षांपासून कुत्र्यांची देखभाल
काही वर्षांपूर्वी एका महिलेचा फोन आला.पती मला मारहाण करतो,शिव्या देतो. त्यामुळे त्याच्यापासून बचाव व्हावा यासाठी माझ्या श्वानाला प्रशिक्षण देण्याची तिने मागणी केली. त्याच दिवशी सेक्युरिटी डॉग्ज कंपनीची कल्पना सुचली. मी २० महिलांना स्पेशल डॉग दिला आहे. आणखी १६ श्वानांची मागणी आहे. मी २५ वर्षांपासून कुत्र्यांची देखभाल करतेय. सुरक्षेत कुत्रा सर्वांत योग्य उपाय आहे हे मला माहीत आहे.
- एंजेल मारिस्कल, संचालिका-डाॅग सेक्युरिटी एजन्सी
बातम्या आणखी आहेत...