आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष सोडण्याची डोनॉल्ड ट्रम्प यांनी दिली धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाचे दावेदार डोनॉल्ड ट्रम्प मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशासाठी बंदी घालावी, या आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर होत असलेल्या चौफेर टीकेनंतर त्यांनी आता रिपब्लिकन पक्ष सोडण्याची धमकी देऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे.

७० टक्क्यांहून अिधक मतदार आपल्या पाठीशी असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, अमेरिकेचा सुरक्षा विभाग असलेल्या पेंटागॉनने ट्रम्प यांचे मुस्लिमविरोधी वक्तव्य अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने चुकीचे असल्याचे म्हटले आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांनुसार हे मुस्लिमविरोधी वक्तव्य अमेरिकी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक ठरू शकते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगाचे उच्चायुक्त झैद राद अल हुसेन यांनी ट्रम्प यांचा हा सल्ला अत्यंत बेजबाबदारपणा असल्याचे म्हटले आहे.
यामुळे दहशतवादाचा बळी ठरणारा सामान्य मुस्लिम माणूसही दहशतवाद्यांच्या इशाऱ्यावर नाचू लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून, फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युएल वॉल्स आणि सरकारसह व्हाइट हाऊसनेही त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दरम्यान, चीनच्या प्रवक्त्यांनी मात्र यावर तत्काळ मत मांडण्यास नकार दिला. हा अमेरिकेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे चीनने म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकी संसदेतील दोन मुस्लिम सदस्यांपैकी एक आंद्रे कार्सन (डेमोक्रॅट) यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे म्हटले आहे.
प्रवेशावर बंदी घाला
ब्रिटनमधील सुमारे ३५ हजार नागरिकांनी डोनॉल्ड ट्रम्प यांच्या ब्रिटन प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या वक्तव्यानंतर ब्रिटनमध्ये दाखल करण्यात आलेल्या ऑनलाइन याचिकांमध्ये ही मागणी करण्यात आली. त्यांच्यावर टीका होत आहे.