आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्प पहिल्याच दिवशी बदलणार ओबामांचे निर्णय, परराष्ट्र धोरण, इमिग्रेशन, वीज धोरणात बदल शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काही निर्णयांमुळे देशाची आर्थिक स्थिती आणि रोजगार निर्मिती या दोन्हींना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी ओबामांचे काही निर्णय बदलण्याची  नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची योजना आहे, अशी माहिती ट्रम्प यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने दिली. 
 
ट्रम्प यांचे आगामी व्हाइट हाऊस वृत्त सचिव सीन स्पायसर यांनी एबीसीच्या ‘धिस वीक’ या कार्यक्रमात सांगितले की, गेल्या आठ वर्षांत घेतलेल्या निर्णयांमुळे देशाचा आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती या दोन्ही घटकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ट्रम्प हे लगेचच ओबामा प्रशासनाने घेतलेले काही निर्णय बदलणार आहेत. ट्रम्प हे २० जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेतील. त्यानंतरच्या दोन पावलांपैकी हे एक पाऊल असेल.  ओबामांचे कोणते निर्णय ट्रम्प बदलतील हे स्पायसर यांनी स्पष्ट केले नाही, पण ओबामांच्या इमिग्रेशन, वीज नियमन आणि परराष्ट्र धोरणावर ट्रम्प यांनी याआधी अनेकदा टीका केली आहे. त्यामुळे ते याबाबतची धोरणेच मागे घेतील, अशी अपेक्षा आहे.  स्पायसर म्हणाले की, वॉशिंग्टनला नवीन ब्रँड करण्याच्या उद्देशाने ट्रम्प काही सुधारणा सुरू करतील. ट्रम्प यांच्या प्रशासनात जे लोक काम करतील त्यांना प्रशासनातून बाहेर पडल्यानंतर पाच वर्षे लॉबिइस्ट म्हणून काम करता येणार नाही. तुम्हाला ट्रम्प यांच्या प्रशासनात सेवा करायची असेल तर ती देशासाठी करावी लागेल, स्वत:साठी नाही, असे धोरणच आम्ही ठरवणार आहोत.  

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याबद्दल ओबामा प्रशासनाने रशियाच्या ३५ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. हा निर्णय ट्रम्प बदलतील का, असा प्रश्न स्पायसर यांना वारंवार विचारण्यात आला. त्यावर, ‘या प्रकरणी गुप्तहेर विभागाकडून माहिती मिळत नाही तोपर्यंत हा निर्णय प्रलंबित ठेवला जाईल,’ एवढेच उत्तर स्पायसर यांनी दिले.  

ट्रम्प यांचे ट्विट्स यापुढेही सुरूच राहणार  
महत्त्वाची धोरणविषयक वक्तव्ये ट्विटरवर जाहीर करण्याची ट्रम्प यांची पद्धत वादग्रस्त ठरली आहे. ते या वादग्रस्त पद्धतीचा यापुढेही अवलंब करतील का, या प्रश्नावर स्पायसर म्हणाले की, निश्चितच. का नाही? सोशल मीडियावर साडेचार कोटींपेक्षा जास्त लोक ट्रम्प यांना फॉलो करतात. त्यांच्याशी ते थेट संवाद करू शकतात.
बातम्या आणखी आहेत...