डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध रिपब्लिकन पक्षाच्या अब्जाधिशाची आघाडीजानेवारीच्या शेवटी अमेरिकेतील विमानतळ आणि अन्य ठिकाणी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध करणारे एकवटू लागले होते. तेव्हाच पाम स्प्रिंग्स, कॅलिफोर्नियाच्या एका गोल्फ रिसॉर्टवर एक वेगळाच विरोध आकाराला येत होता. अब्जाधिश उद्योगपती चार्ल्स कोच यांनी समविचारी ५५० लोकांसमोर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रमुख धोरणांना विरोध करण्याचा मानस व्यक्त केला. ते म्हणाले, हा
आपल्या रिपब्लिकन पक्षाचा प्रश्न आहे म्हणून आपला गप्प बसू शकत नाही.
रस्त्यावर सुरू असलेल्या उदारवाद्यांच्या विरोधापेक्षा कोच यांचा विरोध ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षेवर आघात करू शकतो. याचे कारण म्हणजे कोच यांचे नेटवर्क अनेक वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाला मोठ्या प्रमाणात निधी देण्यासाठी तत्पर आहे. पुढील दोन वर्षांसाठी पक्षासाठी ४० कोटी डॉलरचे बजेट ठेवणाऱ्या या श्रीमंतांची योजना ट्रम्प यांच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्याची आहे. त्यांचा आक्षेप या गोष्टींना आहे - अमेरिकी निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या सीमाकर योजना. काही मुस्लिम देशांच्या निर्वासितांवर बंदी घालणे घालण्याचा निर्णय.
कोच नेटवर्क तसेच इतर दानकर्त्यांचा मोठा प्रभाव अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांवरही आहे. ट्रम्प यांना आपली धोरणे राबवण्यासाठी काँग्रेससमोर जावेच लागेल. काँग्रेस सदस्य ज्या संघटनांच्या मदतीने निवडणूक जिंकतात त्यांना कोच पैसा पुरवतात. कोच समर्थक ग्रूप अमेरिकन फॉर प्रॉस्पेरिटीशी ३६ राज्यात पक्षाचे लाखो कार्यकर्ते जोडले गेले आहेत.