आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प जाणार नाहीत ‘नाे मिलिटरी झाेन’मध्ये ! पुढील अाठवड्यात अाशियाच्या दाैरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाॅशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प हे पुढील अाठवड्यात अाशियाच्या दाैऱ्यात दक्षिण काेरियाला जाणार अाहेत; परंतु ते उत्तर काेरियाच्या सीमेवर असलेल्या ‘नाे मिलिटरी झाेन’ (डीएमजे)चा दाैरा करणार नाहीत. दरम्यान, याबाबत माहिती देताना व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने वेळ नसल्यामुळे ट्रम्प हे तेथे जाणार नसल्याचे सांगितले.

राष्ट्रपती ट्रम्प हे सियाेलपासून ९० किमी दूर असलेल्या हम्फ्रेज कॅम्पमध्ये जातील. तेथे ते अमेरिकी सैन्य दलाच्या जवानांची व त्यांच्या नातेवाइकांची भेट घेतील. अातापर्यंत काेणताही अमेरिकी राष्ट्रपती हम्फ्रेज कॅम्प येथे गेलेला नाही. येथे ट्रम्प यांच्या दाैऱ्याचा अापला एक वेगळा संदेश अाहे, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. मागील अाठवड्यातील दक्षिण काेरियाच्या दाैऱ्यात अमेरिकी परराष्ट्रमंत्री जेम्स मॅटिस हे उत्तर काेरियाच्या सीमेवर गेले हाेते. ६४ वर्षांपूर्वी दाेन्ही काेरियन देशांतील युद्ध समाप्त झाल्यानंतर सीमेवर ५ किमी रुंद व २०० किमी लांब ‘नाे मिलिट्री झाेन’ तयार करण्यात अाला अाहे. १९८३मध्ये राेनाल्ड रिगन हे तेथे गेले हाेते व त्यानंतर जाॅर्ज डब्ल्यू. बुशव्यतिरिक्त सर्व अमेरिकी राष्ट्रपतींनी या क्षेत्राचा दाैरा केला अाहे. तसेच माझी उत्तर काेरियाच्या सीमेवर जाण्याची इच्छा अाहे, असे गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले हाेते.

डोनाल्ड ट्रम्प यांचा अाजार उपचारापलीकडे  : उ.काेरिया 
अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प हे मानसिकदृष्ट्या विक्षिप्त बनले असून, त्यांचा अाजार उपचार करण्यापलीकडे गेला असल्याची प्रतिक्रिया उत्तर काेरियाने व्यक्त केली अाहे. तसेच शारीरिक अाजारासाठी त्यांना अाैषधाेपचाराची गरज असल्याचे उत्तर काेरियाची वृत्तसंस्था केसीएनएने म्हटले अाहे.प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी उत्तर काेरियाकडून सीमेजवळील भागात ट्रम्प यांची श्वानरूपातील चित्रे असलेले फुगे व पाेस्टर अाकाशात सोडले. 
बातम्या आणखी आहेत...