आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांचा फिलिपाइन्समधील मुक्काम बैठकीसाठी वाढवला; आजपासून आशियाच्या दौऱ्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आशिया दौऱ्यातील फिलिपाइन्समधील मुक्काम एक दिवसाने वाढवला आहे. पूर्व आशिया परिषदेच्या निमित्ताने दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती व्हाइट हाऊसच्या सूत्रांनी दिली.  नियोजित वेळापत्रकानुसार ट्रम्प फिलिपाइन्समधील १४ नोव्हेंबरच्या बैठकीपूर्वी मायदेशी परतणार होते, परंतु आता दौऱ्याचा मुक्काम एक दिवसाने वाढवण्यात आला आहे. आधी या परिषदेला त्यांचे सहकारी रेक्स टिलर्सन हजेरी लावणार होते, परंतु आता त्यात बदल करण्यात आला आहे. पूर्व आशिया परिषदेच्या निमित्ताने फिलिपाइन्सच्या अँजेल्स शहरात आसियानमधील दहा देशांचे नेते सहभागी होणार आहेत. भारत, चीन, रशियाचाही त्यात समावेश आहे. 
 
चांगली संधी, योग्य  प्रतिनिधित्व करू  
फिलिपाइन्समधील परिषद हे अतिशय चांगले व्यासपीठ आहे. त्यानिमित्ताने अमेरिकेचे योग्य प्रतिनिधित्व करेल. एक नागरिक म्हणून अमेरिकेला चांगल्या प्रकारे सादर करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विमानातून अमेरिकी नागरिकांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे.  
बातम्या आणखी आहेत...