आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलला बाथरूम कायदा, ट्रान्सजेंडरला केली मनाई, निर्णयाचे स्वागतही, व्हाइट हाऊसच्या बाहेर निदर्शने सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली धक्कादायक निर्णय घेण्याची परंपरा सुरूच ठेवली अाहे. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना त्यांच्या मर्जीच्या पुरुष किंवा महिला बाथरूमचा वापर करण्याची परवानगी देणारा बराक आेबामा यांचा ऐतिहासिक निर्णय ट्रम्प यांनी रद्द केला आहे. त्यामुळे नाराज समुदायाने व्हाइट हाऊसबाहेर निदर्शने केली.  
 
आेबामा यांनी ट्रान्सजेंडर यांना दिलेल्या अधिकारानंतर त्या वेळी ट्रान्सजेंडर समुदायाने जल्लोष केला होता. परंतु ट्रम्प यांनी बाथरूमसंबंधी धोरणात बदल करून राज्यांनी त्याबद्दलचा निर्णय घ्यावा, असे व्हाइट हाऊसने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. शिक्षण व न्याय विभागाने हे आदेश काढला असून राज्यांना त्याबाबतचे अधिकार दिले आहेत.
 
 ट्रान्सजेंडर यांच्याबरोबरच इतर विद्यार्थ्यांचे खासगीपण व सुरक्षेची जबाबदारी शाळा व राज्यांची असेल. ट्रम्प यांच्या नव्या आदेशाचा एलजीबीटी संघटनांना तीव्र विरोध केला आहे. एका गटाने मात्र ट्रम्प यांचे समर्थन केले आहे.
 
या निर्णयामुळे आमची मुले शाळेत सुरक्षित राहू शकतील, असे समर्थन करणाऱ्या गटाचे म्हणणे आहे. आता अमेरिकेत या आदेशामुळे सामाजिक प्रगतीवादी व पारंपरिकतेवर विश्वास ठेवणाऱ्या गटांत संघर्षाला सुरुवात झाली आहे.  
 
आेबामा यांचा होता मदत थांबवण्याचा इशारा : राष्ट्राध्यक्ष आेबामा यांनी मे २०१६ मध्ये याबाबतचा आदेश काढला होता. या आदेशाचे पालन झाले नाही तर सरकारची मदत थांबवण्यात येईल, असा इशारा आेबामा यांनी शाळांना दिला होता.  
 
अनेक राज्यांनी मागितली होती न्यायालयात दाद : आेबामा यांच्या आदेशाच्या विरोधात अनेक राज्ये कोर्टाच्या विरोधात गेली होती. टेक्सासचे अॅटर्नी जनरल कॅन पॅक्सटन यांनी राज्यांकडून याबाबत बाजू मांडली होती. त्यावर कोर्टाने आेबामा यांच्या आदेशाला स्थगिती दिली होती.  

नव्या शिक्षण मंत्री असहमत..  
ट्रम्प यांच्या नवीन धोरणाशी नूतन शिक्षण मंत्री बेट्सी डेवोस सहमत नव्हत्या. त्यांनी अॅटर्नी जनरल जॅप सॅशन्स यांच्याकडे तसे मत व्यक्त केले होते. पण बेट्सी यांना मंगळवारी व्हाइट हाऊसमध्ये पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर मात्र त्यांनी ट्रम्प यांचे समर्थन करत असल्याचे म्हटले आहे. अनेकदा तुम्हाला वाटत नसणाऱ्या अनेक गोष्टी कराव्या लागतात, असे त्या म्हणाल्या.  
 
बातम्या आणखी आहेत...