आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3,643 वेबसाइटचे मालक आहेत राष्ट्रपती ट्रम्प; नावाचा गैरवापर नको म्हणून ट्रम्पफ्रॉड, ट्रम्पस्कॅमसारख्या साइटची केली खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 न्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने ३,६४३ वेबसाइट सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर आपल्याला थोडे आश्चर्य वाटेल. त्यांची नावेही वेगवेगळी आहेत. ट्रम्प अंपायर डॉट कॉमपासून ट्रम्पफ्राॅड आणि ट्रम्पनेटवर्कपोंजीस्कीमपर्यंत. यामधील ९३ वेबसाइट तर राष्ट्रपतिपदाचे उमेदवार झाल्यानंतर त्यांनी खरेदी केल्या आहेत. यातील डोनाल्डजेट्रम्प डॉट कॉम नावाची वेबसाइट त्यांनी पहिल्यांदा २० जानेवारी १९९७ रोजी खरेदी केली होती.
 
ट्रम्पएंपायर ही मेक्सिकोमधील एका अभियंत्याची वेबसाइट होती. ती ट्रम्प यांनी एप्रिल २०१५ मध्ये फक्त १० डॉलरमध्ये खरेदी केली होती. बिझनेस वाढवण्यासाठी या वेबसाइटचा आपल्याला उपयोग होईल, असे ट्रम्प यांना वाटले होते. मात्र, अनेक दिवस कोणताच करार झाला नसल्याने त्यांनी ती रिन्यू केली नाही.
 
ट्रम्पऑर्गनायझेशन आणि ट्रम्प बिल्डिंग डॉट कॉम सारखी नावे तर त्यांनी बिझनेसच्या अपेक्षेपोटी खरेदी केली होती. पुढील काळात त्यांच्या नावाचा कोणी गैरवापर करू नये यासाठी त्यांनी ट्रम्पफ्रॉड आणि ट्रम्पस्कॅम डॉट कॉम सारख्या नावाच्या वेबसाइट खरेदी केल्या.  
 
आवश्यकता नसतानाही ट्रम्प वेबसाइटची खरेदी करतात तसेच नव्याने तयार करत असल्याचा निष्कर्ष सीएनएनच्या एका अहवालात काढण्यात आला होता. मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनी अॅम्वे चालवण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये ट्रम्प नेटवर्क डॉट कॉमची खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी ट्रम्पमल्टिलेव्हलमार्केटिंग, ट्रम्पनेटवर्कफ्रॉड, ट्रम्पनेटवर्कपोंजीस्कीमसारख्या १५ वेबसाइटची खरेदी केली. त्यानंतर २००९ मध्ये ट्रम्प नेटवर्क लाँच करण्यात आले तर २०१२ मध्ये हा बिझनेस बंद करण्यात आला. 
 
ट्रम्प विद्यापीठाबाबतही त्यांनी असेच केले. यासंबंधी १५७ प्रकारच्या नावांची त्यांनी नोंदणी केली. रिअल इस्टेट क्षेत्रातील एका विभागावर २०१० मध्ये गैरव्यवहाराचे आरोप लागल्यानंतर वर्षभरातच त्यांनी हा व्यवसाय बंद केला. दुसऱ्या एका प्रकरणात पुन्हा आरोप लागले, त्या वेळी आपण योग्य असल्याचे सांगण्यासाठी त्यांनी ९८पर्सेंटअप्रूव्हल डॉट कॉम नावाने साइट सुरू केली.
 
राष्ट्रपती बनण्याच्या दोन दिवस आधीच हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी २.५ कोटी डॉलर दिले. ट्रम्प यांच्यावर अनेक खटलेदेखील झाले आहेत. त्यामुळे त्यांनी २००९ मध्ये आयएमबीइंगस्यूडबायदडोनाल्ड नावाने साइट खरेदी केली होती.  
 
मात्र, यातील अनेक वेबसाइट रिकाम्या आहेत. फक्त ५० असे डोमेन आहेत जे वास्तवात ट्रम्प यांच्या बिझनेसशी जोडलेले आहेत. सुमारे ४०० साइट्स तर अशा आहेत ज्यांच्यावर क्लिक केल्यानंतर ट्रम्प ऑर्गनायझेशनच्या वेब पेजवर पोहोचतो. तर काही साइट्स ट्रम्पऑनदबीचऑनलाइन या साइटवर पोहोचवतात.
बातम्या आणखी आहेत...