वॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचे निवासस्थान व्हाइट हाऊसमध्ये “फर्स्ट लेडी’ कार्यालयाच्या परंपरेला फाटा दिला जाणार आहे. त्याऐवजी आता याठिकाणी “फर्स्ट फॅमिली’चे कार्यालय असेल. यामुळे आता ट्रम्प प्रशासनामध्ये त्यांच्या पत्नी मलानिया आणि कन्या इवांका यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असू शकते, असा दावा माध्यमांत केला जात आहे. ट्रम्प यांनी त्यांचे जावई आणि इवांकाचे पती जॅरेड कुशनर यांची व्हाइट हाऊसमध्ये वरिष्ठ सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, फर्स्ट लेडी कार्यालयाला फर्स्ट फॅमिली कार्यालयाचे स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.