आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी गाणार नाही म्हणत गायिकेचा राजीनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात कॉयर ग्रुपच्या एका सदस्याने गाणे गाण्यास नकार देत एका गायिकेने राजीनामा दिला. ट्रम्प यांच्या समारंभात गाण्याचा अर्थ हुकूमशाहीचे समर्थन असा होतो, अशी टिप्पणी तिने केली.  

मॉर्मन टॅबनेकल कॉयर ग्रुपला ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात एक कार्यक्रम सादर करायचा आहे, पण या ग्रुपच्या सदस्य जेन चेंबरलेन हिने ट्रम्प यांच्यासाठी गाणे गाण्यास नकार दिला. तिने कॉयर ग्रुपच्या अध्यक्षांकडे आपला राजीनामाही सादर केला. 
 
जेनने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, मी ट्रम्प यांच्यासाठी गाऊ शकत नाही. कॉयरने त्यांच्यासाठी सादरीकरण करणे म्हणजे हुकूमशाहीला पाठिंबा देणे आहे. ट्रम्प यांना विरोध करणारा गट देशात सक्रिय आहे. 
बातम्या आणखी आहेत...