आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्प यांचे एकाच दिवसात दोनदा घूमजाव; नाटो आता अप्रासंगिक नसल्याची भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एकाच दिवसात दोनदा घूमजाव केले. सिरियावर हल्ल्याच्या सहकार्याबाबत त्यांनी नाटो आता अप्रासंगिक नसल्याची भूमिका मांडली, तर चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यामुळे आपण प्रचंड प्रभावित झालो असून त्यांच्याशी व्यावसायिक संबंध वाढवू, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले. विशेष म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी ट्रम्प यांनी नाटो आणि चीनच्या विरोधात अत्यंत विरोधी भूमिका मांडली होती. 

व्हाइट हाऊसमध्ये नाटो महासचिव जेम्स स्टोल्टेनबर्ग यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, “मी आता बदललो आहे. आधी मी नाटो अप्रासंगिक असल्याचे म्हटले होते. पण नाटो आता अप्रासंगिक नाही. ते दहशतवाद्यांविरोधात लढत आहेत. नाटो आता इराकमध्ये इसिसविरोधातील संघर्षात आमचा सहकारी इराकची मदत करेल, अशी अपेक्षा आहे.’ त्यावर स्टोल्टेनबर्ग म्हणाले, “एक कणखर नाटो युरोपसाठी चांगली तर आहेच, मात्र अमेरिकेसाठीही तितकीच चांगला आहे. फक्त शब्दांतूनच नव्हे, तर कार्यातूनही अमेरिका युरोपला संरक्षण देत आहे. या सहकार्याच्या भावनेतून अमेरिकेची वचनबद्धता दिसून येते.’ 

ट्रम्प पुढे म्हणाले, “चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यामुळे आपण प्रचंड प्रभावित झालो आहोत. त्यांना चांगले आणि दृढ संबंधाची अपेक्षा आहे. त्यामुळे मी त्यांना आता खात्री पटवून दिली आहे की, चीनला आम्ही यापुढे करन्सी मॅनिपुलेटर (चलनवाद घडवणारे) मानणार नाही. उत्तर कोरियाचे प्रकरण त्यांनी योग्य प्रकारे हाताळले तर चीनशी चांगले व्यावसायिक संबंधही प्रस्थापित होऊ शकतात.’ 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...