आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची धूम, रिपब्लिकन दावेदारांच्या गर्दीमुळे अडचणीत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत २०१६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षातील इतके दावेदार सामील आहेत की पक्षाध्यक्ष रन्स प्रयास यांना त्यांची नावेसुद्धा आठवण नाहीत. सर्जन आणि एका सीईओचे नाव आतापर्यंत समोर आले आहे. दावेदारांच्या गर्दीमुळे उमेदवाराची घोषणा लवकर होण्याची शक्यता कमीच आहे.
२०१२ मध्ये मिट रोम्नी यांच्या उमेदवारीपेक्षा जास्त गर्दी २०१६ मध्ये होऊ शकते. उमेदवारांच्या जास्त संख्येमुळे टीव्हीवरील चर्चेत सर्वांना संधी मिळण्याची शक्यता नाही. या चर्चांचा उमेदवारी निश्चितीसाठी होणाऱ्या राष्ट्रीय जनमत संग्रहांवर परिणाम होत असतो. निवडणुकीतील खर्चाबाबतचे नवे नियमही उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू शकतात.
आधी उमेदवार हा प्रत्येक दात्याकडून १ लाख ९१ हजारांपर्यंतच रक्कम घेऊ शकत होते. त्यामुळे जास्त रक्कम गोळा व्हायची. आता उमेदवार पीएसीकडून अमर्याद रक्कम घेऊ शकतात. त्यामुळे अब्जाधीश उमेदवार मोठे प्रचार अभियान राबवू शकतात. जे. बुश यांनी त्यांच्या प्रचार अभियानास अद्याप सुरुवात केलेली नाही. मात्र, त्यांची सुपर पीएसी ६३७ कोटी रुपयांपर्यंतचा निधी गोळा करू शकते.

२०११ मध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार मिट रोम्नी यांनी फक्त ११४ कोटी रुपयांची देणगी जमवली होती. त्यांच्या सुपर पीएसीने त्यात ७६ कोटींची भर घातली होती. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने अनेक लोक दीर्घकाळापर्यंत शर्यतीत असतील. पूर्वी निधी संपल्यानंतर अनेक उमेदवार प्रारंभिक फेरीच्या पराभवानंतरच माघार घ्यायचे. उमेदवार जास्त असल्यास मागणी आणि पुरवठ्याचीही अडचण निर्माण झाली आहे. मतदारांना प्रभावित करणारे सक्षम नेटवर्क आणि तज्ज्ञांची मागणी वाढली आहे.

- फिलिप इलियट यांच्यासह
बातम्या आणखी आहेत...