आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनसोबत इंग्लिशही होणार युरोपियन संघटनेमधून बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- जागतिक भाषा म्हणून आेळखल्या जाणाऱ्या इंग्लिशचा वापर यापुढे केला जाऊ नये, असा विचारविनियम युरोपियन संघटनेतील सदस्य राष्ट्रांत सुरू आहे. त्यामुळे आतापर्यंत संघटनेत इंग्लिशला मिळालेला दर्जा काढून घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते.
खरे तर युरोपियन संघटनेतील सदस्य राष्ट्रांत संस्थात्मक कामकाजात इंग्लिश भाषेला अग्रक्रम होता. परंतु ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या सार्वमतानंतर युरोपातील परिस्थिती झपाट्याने बदलू लागली आहे. ब्रिटनने संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या देशाच्या राष्ट्रभाषेला संघटनेची प्राथमिक भाषा म्हणून का स्वीकारले जावे, असा मतप्रवाह संघटनेत दिसून येत आहे. ब्रिटनने इंग्लिशला २८ सदस्य राष्ट्रांची प्राथमिक भाषा म्हणून नोंदवले होते. त्यानुसार व्यवहार प्राधान्याने याच भाषेतून केले जात होते.

मात्र आता सर्व सदस्यांनी इंग्लिशवर बंदी आणली पाहिजे, अशी आक्रमक भाषा देखील वापरली जाऊ लागली आहे.युरोपियन संघटनेच्या घटनेत एक राजभाषा म्हणून स्वीकारली जाते.
ब्रुसेल्स | ब्रिटनने संघटनेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी भूमिका युरोपियन संघटनेने घेतली आहे. ब्रिटनच्या जनतेने संघटनेतून बाहेर पडण्यासाठी कौल दिला आहे. युरोपियन युनियनने सार्वमतानंतर पहिल्यांदाच विशेष सत्र बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ब्रिटनला बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला जाणार आहे. त्यासंबंधीचा निर्णय तत्काळ घेतला जाऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...