आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... 2,200 मीटर उंच डाेंगरावर कंटेनरने उभारले हाॅटेल, पर्यावरणाचे संरक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाशिया अाणि युराेपला जाेडणाऱ्या रिपब्लिक अाॅफ जाॅर्जियामधील बर्फाच्छादित डाेंगरांच्या २,२०० मीटर उंचीवर दाेन अार्किटेक्टनी असे एक हाॅटेल उभारले ज्याची कल्पना करणेदेखील अशक्य अाहे. अार्किटेक्ट सांद्राे रमिशविली अाणि अाईराकी एेरिस्तावी यांनी काही दिवसांपूर्वी गुडाउरी क्षेत्रास भेट दिली तेव्हा त्यांच्या लक्षात अाले की, जेव्हा एखादे पथक पर्वताराेहण करत निघाले तर त्यांना थांबण्यासाठी जागा मिळणार नाही. त्यानंतर त्यांनी वाहतुकीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या कंटेनरचे पिरॅमिड पद्धतीचे ‘क्वाड्रम’ हाॅटेल उभारले. अातून अाणि बाहेरील भागाची पाहणी केल्यानंतर हे हाॅटेल उभारण्यासाठी कंटेनरचा वापर केल्याचे अजिबात जाणवत नाही. या हाॅटेलच्या उभारणीसाठी पर्यावरणपूरक सामग्री अाणि तंत्रज्ञान वापरण्यात अाले अाहे. 
समतल जागा नसल्यामुळे ड्रील करून लाेखंडी खांब उभारण्यात अाले अाणि कंटेनरला त्याचा अाधार देण्यात अाला. राजधानी तिब्लिसीपासून १२० किलाेमीटर अंतरावर असलेले गुडाउरी क्षेत्र हिवाळी क्रीडा स्पर्धांसाठी सर्वज्ञात अाहे. त्यामुळे ‘क्वाड्रम’मध्ये निवास व्यवस्थेसाेबतच अापत्कालीन स्थितीत उपयुक्त साहित्य ठेवण्यात अालेले अाहे.
 
-happybrainy.com
बातम्या आणखी आहेत...